Ajit Pawar, Shrikant Shinde sarkarnama
मुंबई

दादा हा 'शो' नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो'सारखा..; श्रीकांत शिंदेंनी अजितदादांना सुनावले..

Shrikant Shinde : हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या 'ट्रेलर' नेच धडकी भरली ? पिक्चर अभी बाकी है'

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेतील फाटाफूट, त्यावरचे दावे-प्रतिदावे, नव्या सरकारमधील वाटाघाटी आणि सत्तास्थापनेनंतरच्या संघर्षात पडद्याआडून सूत्रे फिरवणारे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे चांगलेच 'अॅक्शन मोड'आले आहेत. राजकीय लढाई वाढण्याच्या शक्यतेने आधी आपल्या गटाच्या आमदारांच्या बाहुत 'बळ'भरून खासदार शिंदे हे आता विरोधकांना 'दम' भरत आहेत. (MP Shrikant Shinde latest news)

सध्या राज्यभर पेटलेल्या राजकीय व्यापासून आधी काहीसे लांब राहिलेले, शिंदे गटाचे 'पावर सेंटर' ठरलेले खासदार श्रीकांत शिंदेही आता मैदानात उतरुन विरोधकांवर सपासप वार करीत आहेत. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना आव्हान देत, 'पिक्चर अभी बाकी हैं' अशा सूचक शब्दांत खासदार शिंदे यांनी इशारे दिला आहे.

"दसरा मेळाव्यानंतर कळेल कुणामागे किती जनता आहे," अशा शब्दात अजितदादांनी काल (शनिवारी) शिंदे गटावर निशाणा साधला होता. त्याला शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

'दादा, हा 'शो' नाही...पहाटेच्या फ्लॉप 'शो' सारखा असे सांगून शिंदे यांनीही अजितदादांना सुनावले आहे. यानिमित्ताने ठाकरे, अजितदादांपुढे शड्डू ठोकत शिंदे यांनीही राजकीय लढ्यात उतरून 'हम भी किससे कम नहीं' हे दाखविले आहे. त्यामुळे या संघर्षाला धार चढणार असल्याचे संकेत आहेत.

युवासेनेत आक्रमक कार्यकर्ते असल्याचे सांगून चार दिवसांपूर्वी खासदार शिंदे यांनी आदित्य यांना जोरदार धक्का देण्याचा इशारा दिला. त्यानंतरच युवासेनेच्या प्रमुखपदावरून आदित्य यांना काढले जाण्याची चर्चा रंगली. त्यानंतर शिंदे सरकारवर आगपाखड करीत, सरकारच्या स्थिरतेकडे बोट दाखविणाऱ्या अजितदादांनाही खासदार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

स्थापनेनंतर राज्याच्या बहुतांशी भागात फिरून राजकीय अंदाज बांधलेल्या खासदार शिंदे यांनी भल्याभल्या नेत्यांना जशास तसे उत्तर देण्यास सुरवात केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस नेत्यांची फौज शिंदे गटावर तुटुन पडत असल्याने संतप्त झालेल्या खासदार शिंदे यांनी अजितदादांचा समाचार घेतला. यांसदर्भात टि्वट करून खासदार शिंदे यांनी त्यांना उत्तर दिले.

दादा हा 'शो' नाही,

पहाटेच्या फ्लॉप ‘शो' सारखा...

हा 'शो'ले आहे,

एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा !

आणि हो ....

हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या 'ट्रेलर' नेच

धडकी भरली ?

पिक्चर अभी बाकी है' !!! असे खासदार शिंदे यांनी आपल्या टि्वट मध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT