Vandana Chavan News sarkarnama
मुंबई

Vandana Chavan News : शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंना कार्यकारी अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव तर...वंदना चव्हाणांचे मोठे वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

NCP Foundation Day News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीतील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पवार यांनी ही घोषणा केली.

सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा विधानसभेची जबाबदारी आहे. तर, प्रफुल्ल पटेल यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश, गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडीनंतर खासदार वंदना चव्हाण प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

चव्हाण म्हणाल्या, सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली याचा आनंदच आहे. प्रफुल्ल पटेल पक्षाचे उपाध्यक्ष होते. अन्यही ज्येष्ठ नेत्यांवर वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला आहे. तो दर्जा परत मिळवण्यासाठी सर्व राज्यांत पक्षाचा विस्तार करावा लागेल, असे वंदना चव्हाण यांनी सांगितले.

तसेच ''शरद पवार निर्विवाद पक्षाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे पक्षाचे नेतृत्व कुणाकडे जाणार याचा आम्ही विचारसुद्धा करत नाही. जेव्हा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिली होता. तेव्हा जर पवारांनी राजीनामा मागेच घेतला नसता तर…तेव्हा अजित पवार यांनीच सुप्रिया सुळेंना कार्यकारी अध्यक्ष करावे, असा प्रस्ताव दिला होता, असे वंदना चव्हाण यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पेटेल (Praful Patel) यांच्या नियुक्तीनंतर अजित पवार यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये अजित पवार म्हणाले, ''राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.''

''तसेच प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के. के. शर्मा, पी. पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.''

''आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली 'हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…' हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचे योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयाने काम करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!'' असे अजित पवार म्हणाले आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT