MSRTC buses parked at a depot in Maharashtra, soon requiring 17,450 new driver and conductor staff under the latest ST recruitment drive. Sarkarnama
मुंबई

MSRTC Recruitment 2025 : ST मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! तब्बल 'इतक्या' हजार जागांसाठी मेगाभरती

Maharashtra ST Driver Conductor Jobs : एसटीमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात म्हणजेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रवाशांच्या दळणवळणाचा आत्मा मानल्या जाणाऱ्या एसटीमध्ये तब्बल 17 हजार 450 जागांची भरती केली जाणार आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 21 Sep : एसटीमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात म्हणजेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रवाशांच्या दळणवळणाचा आत्मा मानल्या जाणाऱ्या एसटीमध्ये तब्बल 17 हजार 450 जागांची भरती केली जाणार आहे.

चालक आणि सहायक पदांसाठी ही कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. भविष्यात येणाऱ्या 8 हजार नवीन एसटी बससाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने ही भरती केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की, 'येत्या 2 ऑक्टोबर या भरतीसाठीची निविदा प्रक्रिया सुरू होईल. निवड झालेल्या पात्र उमेदवारांना 30 हजार रुपये इतके किमान वेतन दिलं जाणार आहे. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची एक बैठक नुकतीच घेण्यात आली.

या बैठकीत बससेवा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक असलेले चालक व सहायक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने 3 वर्षांच्या कालवधीसाठी घेण्याबाबतची ई-निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही ई-निविदा प्रक्रिया 6 प्रादेशिक विभांगमध्ये राबवली जाणार आहे. तर निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना 30 हजार इतके किमान वेतन दिले जाईल आणि त्यांना प्रशिक्षणही दिलं जाणार असल्याचंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT