Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Sarkarnama
मुंबई

Ladki Bahin Yojana : आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद होणार? शिंदेंच्या नेत्याचं मोठं विधान

Sanjay Nirupam On Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : "लाडकी बहीण योजनेला मागील 25 दिवसात जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ऑनलाईन एक करोड तीस लाख अर्ज आले आहेत, तर ऑफलाइन 50 लाख अर्ज आले आहेत. आमचं टार्गेट दोन करोड ते अडीच करोड आहे."

Jagdish Patil

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत असून याआधी एवढा चांगला प्रतिसाद कोणत्याही योजनेला मिळाला नसल्याचा दावा केला आहे.

तसंच त्यांनी या योजनेबाबतची सविस्तर माहिती देत विरोधकांवर निशाणा साधला. आघाडीचं सरकार आलं तर ही योजना बंद केली जाणार असल्याची अंतर्गत चर्चा असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात बोलताना संजय निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले, लाडकी बहीण योजनेला मागील 25 दिवसात जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ऑनलाईन एक करोड तीस लाख अर्ज आले आहेत, तर ऑफलाइन 50 लाख अर्ज आले आहेत. आमचं टार्गेट दोन करोड ते अडीच करोड आहे. 31 तारखेपर्यंत जेवढे अर्ज येतील तेवढे महाराष्ट्र सरकार स्वीकारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

या योजनेसाठी दिवसाला 7 ते 8 लाख अर्ज जमा होत आहेत. 'नारी शक्ती दूत' हे ॲप्लिकेशन जवळपास 88 लाख महिलांनी डाउनलोड केलं आहे. दिवसाला 650 महिला हे ॲप डाउनलोड करत आहेत. इतका चांगला प्रतिसाद या आधी कोणत्याही योजनेला मिळाला नाही. सगळ्यात जास्त डाउनलोड होणारा ॲप म्हणून हा ॲप देशात 27 व्या क्रमांकावर असल्याचंही त्यांनी सांगितलं.

योजना फेल होणार नाही

यावेळी त्यांनी विरोधकांच्या फंड कुठून आणणार? या प्रश्नाला उत्तर दिलं. ते म्हणाले, विरोधक म्हणतात की फंड कुठून आणणार? पण राज्य सरकारने आधीच या फंडाचे नियोजन केलं असल्याचंही ते म्हणाले. महायुती सरकारबद्दल लोकांमध्ये जबरदस्त विश्वास आहे. काँग्रेसच्या खटाखट योजनेसारखी ही योजना फेल होणार नाही. महिला उत्साहात अर्ज भरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जो शब्द देतात तो शब्द पाळतात.

राजस्थानचे आधीचे आणि आताचे कर्नाटकमधील काँग्रेस सरकार यांनी अशा प्रकारच्या योजना आणल्या होत्या. मात्र, त्या योजना अजूनही लागू झालेल्या नाहीत. तसंच काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा आहे की, त्यांचे सरकार आले तर ही योजना बंद करणार, असा मोठा दावा निरुपम यांनी यावेळी केला. या योजनेसाठी राज्य सरकारने केंद्राकडे एकही रुपया मागितलेला नाही. ही राज्य सरकारची स्वतःची योजना आहे.

तसंच ही पहिली योजना आहे, जी कागदामधून बाहेर निघेल आणि फक्त 25 दिवसात महाराष्ट्रभर पसरेल. 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होतील. सगळे विरोधक विरोध करायचा म्हणून विरोध करत आहेत, पण काँग्रेस, ठाकरे गट आपल्या पक्षाच्या कार्यालयात महिलांना बोलवून अर्ज भरून घेत आहेत. माझे विरोधी पक्षांना विनंती आहे की त्यांनी लोकांच्या मनात भ्रम निर्माण करू नये, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी विरोधकांना केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT