Mumbai Political News: लोकसभेतील यशानंतर महाविकास आघाडी विधानसभेच्या तयारीला लागली आहे. अनेक सर्व्हेंमध्ये महाविकास आघाडी सत्ता स्थापन करताना दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर जागावाटपाची खलबते महाविकास आघाडीतील तीनही घटकपक्षांमध्ये सुरू आहे. मुंबईत 36 जागांवर आघाडीतील तीनही पक्षांनी दावा केला आहे.
मात्र, फक्त पाच जागा अशा आहेत, तिथे आघाडीतील कोणत्याही पक्षानं दावा केला नसल्याचं समजत आहे. या पाच ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे पराभवाच्या भीतीनं या जागांवर दावा करण्यात आला नसल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. मुंबई आणि शिवसेना ( ठाकरे गट ) हे नात नवीन नाही. मात्र, शिवसेनेसह ( Shivsena ) काँग्रेसनंही अनेक जागांवर दावा केला आहे. त्यासह काही जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसही ( शरदचंद्र पवार ) आग्रही आहे. पण, मुंबईतील पाच जागा अशा आहेत, त्यावर तीनही पक्षांकडून दावा करण्यात आला नाही.
मुख्यत्त्वे पाच जागांवरही भाजपचे ( Bjp ) आमदार आहेत. त्यामध्ये मलबार हिल ( मंगलप्रभात लोढा ), विलेपार्ले ( पराग अळवणी ), चारकोप ( योगेश सागर ), बोरिवली ( सुनील राणे ), मुलुंड ( मिहिर कोटेचा ) या जागांचा समावेश आहे.
पाचमधील काही मतदारसंघ आपल्या वाट्याला आले, तर पराभव होईल, अशी भीती शिवसेना ( ठाकरे गट ), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ( शरदचंद्र पवार ) आहे. त्यामुळे यातील जागा आपल्याकडे न येता मित्रपक्षांकडे जाव्यात म्हणून कोणीही दावा केला नसल्याचं बोललं जात आहे.
जागांची अदलाबदल होणार?
मुंबईतील 36 पैकी 22 ठाकरे आणि 18 जागांवर काँग्रेसनं दावा केल्याचं समजतं. काँग्रेसकडे असलेल्या धारावी मतदारसंघासाठी शिवसेना, तर शिवसेनेकडे असलेल्या भायखळ मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही आहे. धारावी मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार होत्या. सध्या त्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. तर, भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव आमदार आहेत. त्या सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत.
सात जागांवर राष्ट्रवादीचा डोळा?
मुंबईतील सात जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) प्रयत्न करत आहे. त्यात अणुशक्ती नगर, कुर्ला, वर्सोवा, अंधेर पश्चिम, दहिसर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.