Congress leader Sachin Sawant releases a controversial video of newly appointed Mumbai BJP president Amit Satam. Sarkarnama
मुंबई

Amit Satam News : मुंबई भाजपचे अध्यक्ष होताच अमित साटम यांचे वादग्रस्त व्हिडीओ विरोधकांनी काढले बाहेर

Amit Satam becomes Mumbai BJP chief : अत्यंत सुमधुर भाषेत बोलणारा पोलिसांशी व महापालिका अधिकाऱ्यांशी सुसंवाद ठेवणारा सुसंस्कृत अध्यक्ष भाजपाने दिला असल्याचा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे.

Rajanand More

थोडक्यात महत्वाचे :

·  भाजप आमदार अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती होताच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी त्यांचे वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.

·  व्हिडीओंमध्ये अमित साटम पोलिस अधिकाऱ्यांसमोर आक्रमक होत शिवीगाळ करताना दिसत असून यावरून विरोधकांनी टीका केली आहे.

·  सावंत यांनी भाजपावर राष्ट्रीय अध्यक्ष नसताना प्रांतीय व मुंबई अध्यक्षांची नियुक्ती कशी झाली असा सवाल करत टोलेबाजी केली.

Congress leader Sachin Sawant’s sharp reaction : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने भाकरी फिरवली आहे. आमदार अमित साटम यांच्यावर मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. त्यानंतर आता विरोधकांनी अमित साटम यांचे वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल करण्यास सुरूवात केली आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट करत भाजप आणि अमित साटम यांना डिवटले आहे. त्यांनी साटम शिवीगाळ करतानाचे दोन व्हिडीओ लिंक सोशल मीडियात पोस्ट केल्या आहेत. एका व्हिडीओमध्ये अमित साटम हे अत्यंत आक्रमक होत पोलिस अधिकाऱ्यांसमोरच अश्लिल शिवीगाळ करत असल्याचे दिसते.

सचिन सावंत यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, रविंद्र चव्हाण भाजपाचे प्रांताध्यक्ष झाले. आता अमित साटम मुंबई भाजपचे अध्यक्ष झाले. कुठे निवडणूक झाल्याची माहिती नाही. असो, राष्ट्रीय अध्यक्ष कधी नियुक्त होणार? ते सांगा. राष्ट्रीय अध्यक्ष नसताना महाराष्ट्र व मुंबई चे अध्यक्ष कसे नियुक्त झाले हा प्रश्न आहेच. परंतु जगातील सगळ्यात मोठा पक्ष असा टेंभा मिरवणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळू नये? भाजपा आणि संघात काही चाललंय काय?, असा प्रश्न सावंत यांनी केला आहे.  

आता अमित साटम यांच्या नियुक्तीने भाजपाची भाषा समृद्ध होईल एवढे निश्चित! अत्यंत सुमधुर भाषेत बोलणारा पोलिसांशी व महापालिका अधिकाऱ्यांशी सुसंवाद ठेवणारा सुसंस्कृत अध्यक्ष भाजपाने दिल्याने पार्टी विथ डिफरन्स पुन्हा सिद्ध झाले आहे. यांच्या भाषेच्या गोडव्यांनी संपूर्ण युट्युब जग व्यापले आहे, असा खोचक टोला सावंत यांनी लगावला आहे.  

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: मुंबई भाजपाचे नवीन अध्यक्ष कोण झाले?
A: आमदार अमित साटम यांना मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

Q2: विरोधकांनी कोणते व्हिडीओ व्हायरल केले?
A: अमित साटम पोलिस अधिकाऱ्यांसमोर शिवीगाळ करतानाचे दोन व्हिडीओ.

Q3: काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी काय टीका केली?
A: त्यांनी भाजपावर राष्ट्रीय अध्यक्ष नसतानाही नियुक्त्या केल्याचा आरोप केला आणि अमित साटम यांची भाषा चेष्टेचा विषय बनवली.

Q4: नियुक्तीची घोषणा कोणी केली?
A: भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घोषणा केली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT