Mumbai BMC news Sarkarnama
मुंबई

Bangladeshi birth certificate case : मुंबईत ‘घुसखोर’ कनेक्शनचा स्फोट! दोन वैद्यकीय अधिकारी निलंबित, आठ जणांवर फौजदारी; बांगलादेशी-रोहिंग्यांना दाखले दिल्याचा महापौरांचा दावा

Mumbai BMC Suspends 2 Doctors in Bangladeshi-Rohingya Birth Certificate Case : बांगलादेशी अन् रोहिंग्यांना जन्म दाखला दिल्याप्रकरणी मुंबई महापालिकेतील दोन वैद्यकीय अधिकारी आणि आठ जणांविरोधात फौजदारी कारवाई झाली.

Pradeep Pendhare

Mumbai BMC news : मुंबईत आगामी काळात बेकायदेशीर बांगलादेशी, रोहिंगे घुसखोरी प्रकरण चांगलंच तापणार असल्याचे चित्र आहे. मुंबईत महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संगनमताने बांगलादेशी, रोहिंगे यांना पैसे घेऊन जन्म प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी बोगस कागदपत्रांच्या आधारे हे प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, आठ जणांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली आहे, अशी धक्कादायक माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली.

रितू तावडे यांनी महापौरपदाचा पदभार स्वीकारताना, मुंबईत (Mumbai) बांगलादेशींची घुसखोरीवर कारवाईचे संकेत दिले होते. घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींना जन्म दाखल्याचं वितरण झाल्याची संशय आहे. त्यानुसार आता कारवाईला सुरवात झाली आहे. याची माहिती महापौर तावडे, उपमहापौर संजय घाडी, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

'मुंबईतील बांगलादेशी यांच्या शोधासाठी प्रत्येक फेरीवाल्यांची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी शोधमोहीम राबविण्यात येणार आहे,' असे महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईत ज्यांचा जन्म झालेला नाही, जे रुग्णालय अस्तित्वात नाही, अशा रुग्णालयाच्या नावाने बोगस जन्म प्रमाणपत्र पालिकेच्या आरोग्य खात्याने, अधिकाऱ्यांनी दिली आहेत. अशी 10 हजार प्रकरणे गोवंडी, मानखुर्द, कलिना, बेहरामपाडा, नागपाडा, कुर्ला आदी विभागांतील असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार किरीट सोमय्या (BJP) यांनी केला आहे. याबाबतची माहिती संबंधित पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आलेली असून त्याचा पाठपुरावा करीत असल्याचेही सोमय्या यांनी दिली.

दरम्यान, बांगलादेशी अन् रोहिंग्यांच्या बेकायदेशीर घुसखोरीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी, केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला होता. केंद्राशी निगडीत असलेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्रातील भाजप मोदी सरकारने द्यावी. देशाची सीमा सुरक्षा केंद्राच्या हातात आहे. बांगलादेशींनी घुसखोरी कशी केली? घुसले तर, घुसले ते इतके दिवस कसे राहिले ? भाजप गेल्या दशकाहून अधिक काळ केंद्र सरकार चालवत आहे? असे बोचणारे प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.

मुंबई महापौरांच्या भूमिकेवर बोलताना, मुंबईकरांच्या मुलभूत प्रश्नांपेक्षा घुसखोर बांगलादेशींवर महापौरांनी लक्ष केंद्रीत केले आहे. असा निशाणा साधत असतानाच महापालिकेतील दोघा वैद्यकीय अधिकारी आणि आठ जणांविरोधात फौजदारी कारवाई झाल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली. यामुळे टीका करणारे आदित्य ठाकरे तोंडघशी, तर पडले नाही ना, असा सूर उमटू लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT