Tipu Sultan photo row : फोटोवरून पेटलं मालेगाव! टिपू सुलतानचा फोटो हटवा, नाहीतर… शिंदे शिलेदारांचा अल्टिमेटम

Malegaon Deputy Mayor Shan-e-Hind Tipu Sultan Photo Sparks Row; Eknath Shinde Shiv Sena Demands Removal : मालेगाव महापालिकेचे उपमहापौर शाने हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यावरून राजकीय वाद पेटला आहे.
Tipu Sultan photo row 1
Tipu Sultan photo row 1Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Malegaon news : मालेगाव महापालिकेत नवीन वादाला तोंड फुटलं आहे. समाजवादी पक्षाचे उपमहापौर शान-ए-हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यावरून या वादाला तोंड फुटलं आहे.

एकनाथ शिंदे शिवसेना या लावलेल्या फोटोवरून आक्रमक झाली असून, तो हटवण्याची मागणी केली आहे. समाजवादी पक्षाच्या उपमहापौराने घेतलेली ही भूमिका अन् त्यावरून निर्माण झालेल्या वादावर सत्तेतील सर्वात मोठा पक्ष असलेला इस्लाम पार्टी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे.

मालेगाव (Malegaon) महापालिकेत, इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी सत्तेत आहे. इस्लाम पार्टीच्या ... महापौर, तर समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद हे उपमहापौर पदावर नुकताच निवड झाली आहे. परंतु शान-ए-हिंद यांच्या उपमहापौर दालनातील एक फोटोचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून, त्यात त्यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याचे दिसते आहे.

शान-ए-हिंद यांच्या उपमहापौर दालनाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच, त्याची शहानिशा करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. मालेगाव महापालिकेतील आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे धाव घेत, लावलेल्या फोटो काढा, अशी मागणी केली आहे. उपमहापौर यांनी दालनात फोटो लावण्याचा घेतलेल्या या निर्णयाचा निषेध देखील केला आहे.

Tipu Sultan photo row 1
Bangladeshi infiltrators : सीमा भेदली, गुप्तचर झोपले? मुंबई महापौरांचा घुसखोर बांगलादेशींविरोधात एल्गार; आदित्य ठाकरेंनी थेट केंद्राला काढला चिमटा

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी गटनेता नीलेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली, आयुक्तांना निवेदन देत, निषेध नोंदवला. उपमहापौरांच्या दालनातील फोटो काढण्याची मागणी केली. जोपर्यंत फोटो काढत नाहीत, तोपर्यंत आम्ही जोरदार निदर्शन करत राहू, यानंतर हे निदर्शन आंदोलनात परिवर्तन होईल, असा इशारा या वेळी दिला. यामुळे आयुक्तांच्या दालनात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Tipu Sultan photo row 1
Narhari Zirwal ACB raid : झिरवळांविरोधात 'डर्टी पॉलिटिक्स'? यशोमती ठाकुरांचा स्फोटक दावा; भाजपला थेट फटका

टिपू सुलतान फ्रीडम फायटर होते. भाजपचे एक खासदार यांनी देखील मान्य केले होते की, टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. महाराष्ट्र सरकारने देखील अधिसूचना नोंदणी करून त्यांची जयंती साजरी करावी, असं सांगितलं आहे, तर हे विरोध करणारे कोण आहेत, अशा भाषेत उपमहापौर शान-ए-हिंद यांनी एकनाथ शिंदे शिवसेनाला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, एकंदरीतच मालेगावात टिपू सुलतानच्या छायाचित्रावरून निर्माण झालेल्या वादात मालेगावातील सत्ताधारी असलेल्या इस्लाम पार्टी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून उपमहापौरांना कोणता निरोप जातो, याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com