BJP 100 Plus Seats Sarkarnama
मुंबई

BJP 100 Plus Seats : मुंबईत भाजपला '100 प्लस'? मोहित कंबोजचा दावा; ठाकरेंच्या शिलेदाराचा ‘क्रोनॉलॉजी’वर घणाघात!

Mumbai BMC Election: BJP 100 Plus Claim by Mohit Kamboj, Akhil Chitre Hits Back : मुंबई महापालिकेत भाजप '100 प्लस' जागा जिंकेल, मोहित कंबोज यांच्या या दाव्यावर अखिल चित्रे यांनी भाजपच्या क्रोनॉलॉजी सांगितली.

Pradeep Pendhare

Mumbai Municipal Corporation Election : राज्यात 29 महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. यात पहिले कल येण्यास सुरवात झाली आहे. यात सर्वात जास्त लक्ष लागलं आहे ते, मुंबई महापालिकेच्या निकालाकडे!

परंतु भाजपचे मोहित कंबोज यांनी मुंबई महापालिकेत भाजप '100 प्लस' जागा जिंकेल, असा अंदाज व्यक्त केला. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी भाजपच्या ‘क्रोनॉलॉजी’वर हल्ला चढवला आहे.

मुंबई महापालिकेत भाजप-एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना सत्ता येईल, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. पहिल्या कलांनुसार भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना आघाडीवर आहे. परंतु या युतीमध्ये सर्वाधिक जागा कोणाला मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. यातच भाजपचे मोहित कंबोज यांनी समाज माध्यमांवरील 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर करत, मुंबई महापालिकेत भाजपला '100 प्लस' जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

मोहित कंबोज यांच्या या अंदाजावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी 'एक्स' खात्यावर प्रतिक्रिया देताना, भाजपच्या 'क्रोनॉलॉजी'वर हल्ला चढवला आहे. भाजप (BJP) निवडणुकीत पाण्यासारखा पैसा ओततो. तेव्हा कंबोज अमेरिकेत असतो, याकडे लक्ष वेधलं आहे.

अखिल चित्रे यांनी म्हटले पुढे म्हटले आहे की, मग कंबोज निवडणुकीच्या आधी भारतात येतो. भाजपच्या विजयाचे आकडे देतो. तसेच एक्झिट पोल येतात. आणि तरीही जनमानस चिंतेत आणि फक्त कंबोजचा पक्ष आसुरी आनंदात असतो! असे म्हटले आहे.

अखिल चित्रे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एक अनाहूत भीती व्यक्त करताना म्हटले आहे की, "हेच आपण पाहतोय, आणि निवडणूक निकालात हे कंबोजचे आकडे खरे ठरले, तर 'कंबोज: अमेरिका: ईव्हीएम: भाजप: अघोरी बहुमत' ह्यांचा परस्परांशी काहीही संबंध आढळला, तर तो महाराष्ट्र्राने योगायोग का समजावा? पण आता वाचा आणि निमूटपणे सहन करा!"

राज्यात भाजप आघाडीवर

आतापर्यंत आलेल्या कलानुसार मुंबई महापालिकेत भाजप-एकनाथ शिंदे युतीला 25 आणि ठाकरे बंधू 16 ठिकाणी आघाडीवर आहेत. राज्यातील महापालिकेत बहुतांशी ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. यामुळे राज्यात बहुतांशी महापालिकेत भाजपचा महापौर बसेल, असे चित्र निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT