

Thane Municipal Corporation Election 2026 : राज्यात काल महापालिकांसाठी मतदान झाले. काल दिवसभर गोंधळ होता. मतदार यादीत नाव सापडण्यापासून ते बोगस मतदानापर्यंत, तर मतदान यंत्र ईव्हीएम मशीनच्या बिघाडापर्यंत तक्रारी होत्या. मतमोजणीला अवघे काही क्षण बाकी असतानाच, 'शाॅक' मारणाऱ्या 'ईव्हीएम' मशीनची चर्चा होती. ठाणे महापालिका निवडणुकीतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.
महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान ठाण्यातील (Thane) प्रभाग क्रमांक तीन मधील एका केंद्रावर चक्क मतदान यंत्राला विद्युतप्रवाह लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे काही काळ मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मानपाडा परिसरातील सेंट झेवियर्स शाळेत असलेल्या मतदान (Voter) केंद्रावर (खोली क्रमांक 10 आणि 12) सकाळी मतदानाला सुरवात होताच, तिथल्या दोन यंत्रांमध्ये बिघाड झाला. खोली क्रमांक 12 मधील मतदान यंत्राला स्पर्श केला असता चक्क शॉक लागत असल्याचे लक्षात आले.
सुरक्षेच्या कारणास्तव इथले मतदान तातडीनं थांबवण्यात आले. तर खोली क्रमांक 10 मधील यंत्रातही तांत्रिक एरर आल्याने मतदारांचा खोळंबा झाला होता. आज मतमोजणी होत आहे. त्यामुळे इथल्या यंत्रातील मतमोजणी कशी होणार, याची चर्चा रंगली आहे.
मतमोजणीला थोड्याच वेळात सुरवात होत असतानाच, काल झालेल्या मतदानाच्या दिवसाची गोंधळाची चर्चा आहे. मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असली, तरी काही मतदारांना मतदार याद्यांतील गोंधळाचा फटका बसला. मतदान करता आले नाही. ईव्हीएम बिघडामुळे तास-तास ताटकळत मतदान केंद्रावर थांबाव लागलं.
मतदान केंद्रावर असलेल्या मतदार यादीत नाव न सापडणे, बूथ, मतदान केंद्र बदलले गेल्याने अनेकांना एका मतदान केंद्रावरून दुसऱ्या मतदान केंद्रापर्यंत पायपीट करावी लागली. उमेदवारांकडे असलेल्या मतदारांच्या याद्या आणि मतदान केंद्रातील याद्या यात काही प्रमाणात फरक असल्याने हा गोंधळ उडल्याच्या तक्रारी मतदार करत होते.
मुंबईत अनेक ठिकाणी अशा तक्रारी होत्या. अचानक मतदारांची नावे गायब करून नागरिकांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. आयत्या वेळी कुठेही दाद मागून मतदान करण्याची व्यवस्था नाही, याची खंत देखील मतदारांनी बोलावून दाखवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.