Mumbai BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकांचे कल समोर आले आहे. भाजप-एकनाथ शिंदे आघाडीवर दिसत आहे. ठाकरे बंधूंची युती त्याखालोखाल दिसत आहे. मतदारांचा कल स्पष्ट दिसत असला, तरी महिला मतदारांचा कल कोणाकडे होता, याचा अंदाज देखील 'एक्झिट पोल' मांडणाऱ्या कंपन्यांनी केला आहे.
यानुसार 'एक्झिट पोल'नुसार एकनाथ शिंदे शिवसेनेपेक्षा भाजपला मुंबईत लाडक्या बहिणींनी सर्वाधिक पसंती दिली आहे. त्याखालोखाल ठाकरे बंधूंच्या आणि काँग्रेसला पसंती दिली. एकप्रकारे लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत धक्का दिल्याचं चित्र आहे.
लोकसभेला फटका बसल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आणली. या योजनेद्वारे लाडक्या बहिणी लाभार्थ्यांना वैयक्तिक दीड हजार रुपये दिले जातात. ही योजना महायुतीने महापालिका निवडणुकीत पुन्हा मोठ्याप्रमाणात प्रचारात वापरली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या योजनेवर प्रचारसभांमध्ये मोठा जोर होता. परंतु एक्झिट पोलनुसार लाडकी बहिणींनी मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदे शिवसेनेपेक्षा भाजपला सर्वाधिक पसंती दिली आहे.
‘ॲक्सिस माय इंडिया’च्या सर्वेक्षणानुसार, भाजपला (BJP) 40 टक्के पुरुष, 44 टक्के महिलांनी पसंती दाखवली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला 33 टक्के पुरुष आणि 31 टक्के महिलांनी मतदान केल्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 13 टक्के महिला आणि पुरुष मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या सर्वेनुसार महिला मतदारांची सर्वाधिक पसंती भाजप अन् त्याखालोखाल ठाकरे बंधूंना दिल्याचे दिसते. मुंबईत काँग्रेसला देखील महिला मतदारांनी चांगली पसंती दिल्याचे दिसते. 13 टक्के महिला मतदार काँग्रेसच्या बाजूने आहे. हा आकडा काँग्रेसला दिलासा देणार आहे.
सकाळ माध्यम समूहाच्या ‘साम टीव्ही’च्या सर्वेक्षणानुसार, मुंबईत 25 वर्षानंतर शिवसेनेची सत्ता जाऊन भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्या हातात मुंबई महापालिकेच्या चाव्या जाण्याची शक्यता आहे. ‘साम’च्या एक्झिट पोलमध्येही महायुतीच्या बाजूने जनमत असल्याचे दिसले. त्यात मुंबईत महायुतीला 122 जागा मिळतील. भाजप 84, एकनाथ शिंदे शिवसेना 35, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष 65 आणि मनसेला 10 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.