Devendra Fadnavis countering Thackeray’s claims ahead of the Mumbai BMC election. Sarkarnama
मुंबई

BMC Election : '70 हजार कोटींच्या फिक्स डिपॉझिटच्या रिसिट काय चाटायच्या आहेत...'; CM फडणवीसांनी ठाकरेंना कोंडीत पकडलं

Devendra Fadnavis On Thackeray : भाजपची सत्ता आली तर मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होईल अशी वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जात आहेत. शिवाय मुंबई परप्रातीयांच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टीका ठाकरेंकडून केली जाते. ठाकरेंच्या याच आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 04 Jan : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपची सत्ता आली तर मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होईल अशी वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जात आहेत.

शिवाय मुंबई परप्रातीयांच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टीका ठाकरेंकडून केली जाते. ठाकरेंच्या याच आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवाय आम्ही निर्धार केला की बीडीडी चाळी बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही. अन्यथा 80 हजार मराठी माणसे मुंबईतून हद्दपार होणार होती, असा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे.

ते भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित केलेल्या प्रचार प्रारंभाच्या संयुक्त मेळाव्यात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मुंबईला जे काही मिळालं तितकं ठाकरेंच्या काळात का मिळालं नाही? कोस्टल रोड, बीडीडीचा विकास, मेट्रो कोणी केले हे जनतेला सर्व माहिती आहे.

मात्र या प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली हे विचाराल तर पब्लिक एकच नाव घेतील ते म्हणजे उद्धव ठाकरे, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली. तर यावेळी त्यांनी महापालिकेच्या फिक्स डिपॉझिटच्या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, 70 हजार कोटींच्या फिक्स डिपॉझिटच्या रिसिट काय चाटायच्या आहेत. हद्दपार होणाऱ्या गिरणी कामगाराला त्या 2-4 हजार कोटींत मुंबईत घर मिळाले असते, असं म्हणत त्यांनी ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

शिवाय बीडीडी चाळीचा अनेक वर्षांचा संघर्ष चालला होता. आम्ही बीडीडी चाळ आम्ही निर्माण केली. 80 हजार लोकं याची वाट बघत होते. मात्र यांनी बिल्डर्सच्या नादात सत्यानाश केला. आम्ही निर्णय केला स्वत: म्हाडा बांधेल आणि आज इमारती उभ्या करत चाव्या दिल्या. आम्ही निर्धार केला बीडीडी चाळी बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही. नाहीतर 80 हजार मराठी माणसे मुंबईतून हद्दपार होणार होती, असा दावा त्यांनी यावेळी केला.

निवडणूक आली की, यांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते, त्यांची बुद्धी सरकते, पण मुंबई तिथेच असते. मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकार 450 किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क पूर्ण करणार असून हा प्रकल्प 2028-29 पर्यंत मुंबईच नव्हे तर विस्तारित मुंबईत एका ठिकाणहून दुसरीकडे केवळ 59 मिनिटांत जाता येईल, असंही आश्वासन फडणवीसांनी या सभेत बोलताना दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT