Pune NCP Candidate : पुण्यातील अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या; 'ती' जागाच ठरली कारणीभूत

Pune Municipal Election : आधीच गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांसह मित्रपक्ष भाजपकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या उमेदवारावराच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्यामुळे अजितदादांच्या पक्षावर आणखी टीका होण्याची शक्यता आहे.
Police investigate the suicide case in Pune as allegations emerge linking a civic election candidate to a dispute mentioned in a Death note.
Police investigate the suicide case in Pune as allegations emerge linking a civic election candidate to a dispute mentioned in a Death note.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 04 Jan : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. ती म्हणजे सादिक उर्फ बाबू कपूर नावाच्या व्यक्तीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहून आत्महत्या केली आहे.

या घटनेमुळे आता परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सादिक उर्फ बाबू कपूर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हाताच्या पंजावर काही मजकूर लिहला आहे. शिवाय त्यांनी 30 पानांची सुसाईड नोट लिहली आहे.

त्यामध्ये आत्महत्येचं कारण आणि त्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांची नावे लिहिली आहेत.याच सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 41 मधील उमेदवाराच्या नावाचाही उल्लेख असल्याचं सांगितलं जात आहे.

Police investigate the suicide case in Pune as allegations emerge linking a civic election candidate to a dispute mentioned in a Death note.
BMC Election 2026 : 'नील तू उद्धव काकांना डोळा मारला होता का? मुलाच्या एकतर्फी विजयाची खात्री होताच, किरीट सोमय्यांनी ठाकरेंना डिवचलं...

तर आधीच गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांसह मित्रपक्ष भाजपकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या उमेदवारावराच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्यामुळे अजितदादांच्या पक्षावर आणखी टीका होण्याची शक्यता आहे.

Police investigate the suicide case in Pune as allegations emerge linking a civic election candidate to a dispute mentioned in a Death note.
Chandrakant Patil : 'पाईपलाईनचे पैसे थेट बावड्याच्या घरात...', चंद्रकांत पाटलांनी वादाला तोंड फोडलं

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सय्यद नगर भागातील पाच गुंठे जमिनीवरून राष्ट्रवादीचे उमेदवार फारुख शेख आणि सादिक उर्फ बाबू कपूर यांच्यात वाद सुरु होता. त्याच वादातून फारुख शेख यांनी सादिक यांना त्रास दिल्याचा आरोप कपूर कुटुंबियांकडून केला जात आहे.

याच त्रासाला कंटाळून अखेर सादिक यांनी आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये अनेक व्यक्तींची नावं लिहिली आहेत. तर दरम्यान सादिक कपूर याची पार्श्वभूमीही देखील गुन्हेगारी स्वरुपाची असून त्याच्यावर मकोका कायद्यातंर्गत कारवाई झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com