Mumbai Municipal Corporation Elections : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत राज्यात सर्वात मोठी घडामोडी जी होत आहे ती, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि राज ठाकरे यांच्या मनसेची युती! पुढील काही क्षणात युतीची घोषणा होईल.
परंतु या युतीने आगामी काळातील राजकारणाची दिशा बदलणार आहे, हे निश्चित! मुंबई महापालिकेसह राज्यातील प्रमुख दहा महापालिकांमध्ये शिवसेना-मनसे युती होणार असल्याचे चित्र आहे.
ठाकरे बंधूंची ही युती मुंबई (Mumbai) महापालिकेपुरती मर्यादित नसल्याचे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, अशा प्रमुख महापालिकांमध्ये युती जवळपास निश्चित असल्याचे सूत्रांकडून समजते. ही युती केवळ निवडणुकीपुरती नसून, आगामी राजकारणाची नवी दिशा ठरवणारी ठरू शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
महापालिका निवडणुकीत (Municipal Elections) ठाकरे बंधूंनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. उमेदवार निश्चित करण्यापासून ते प्रचारसभांपर्यंत सर्व नियोजन पूर्ण झालं आहे. काही जागांवर युतीत वाद असून, तो देखील सुटल्याचे सांगितले जात आहे. ‘जागावाटपाची चर्चा फार लांबवू नका, जिथे घोडे अडले आहे, तिथे जास्त रस्सीखेच करू नका,’ असा स्पष्ट निरोप राज ठाकरे यांनी संजय राऊत आणि अनिल परब यांच्यामार्फत शिवसेना ठाकरे पक्षाला दिला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती निश्चित झाली असून, आज दुपारी 12 वाजता त्याची अधिकृत घोषणा होईल. या युतीच्या घोषणेपूर्वीच दोघा बंधूंमध्ये, ज्या महापालिका युतीमध्ये लढवायच्या आहेत, तिथं जागा वाटप निश्चित झाल्याचे सांगितले जाते.
मुंबई महापालिकेतील 227 जागांसाठी जागावाटपाचे गणित जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेना उद्ध बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष 145 ते 150 जागा आणि मनसे 65 ते 70 जागा लढवील.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 10 ते 12 जागा लढवेल. विशेष म्हणजे, 2017 मध्ये शिवसेना ठाकरे पक्षाने जिंकलेल्या ज्या जागांचे नगरसेवक आता एकनाथ शिंदे शिवसेनेते गेले आहेत, त्यातील 12 ते 15 जागा मनसेला सोडण्यात आल्या आहेत. तिथे मनसेकडे ताकदवान उमेदवार असल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.