

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा काही तासांत होणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे दिले आहेत.
या संभाव्य युतीवर शिंदेंची शिवसेना व भाजपकडून टीका होत असतानाच मंत्री भरत गोगावले यांनी ठाकरे बंधूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
Raigad News : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. आता सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणीला वेग दिला आहे. तसेच युती आणि आघाडी करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. यादरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या त्याला मुर्त रूप येण्यास आहे. अवघ्या काही तासात याची घोषणा होणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत दिले आहेत. यामुळे सध्या शिवसेना आणि मनसेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. तर या होणाऱ्या युतीच्या घोषणेवरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडून जोरदार टीका केली जातेय. अशातच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी यावर भाष्य करताना ठाकरे बंधूना शुभेच्छा दिल्या आहेत. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर महापालिकेच्या निवडणुकींचा बिगुल वाजला असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीसाठी पावलं उचलण्यास सुरूवात करतनाही दिसत आहेत. यांच्या युतीची घोषणा उद्या (ता.२३) होण्याची शक्यता आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. त्यांनी, २३ तारखेच्या आधी मनसे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या युतीची घोषणा एकत्रितपणे, धुमधडाक्यात आणि वाजतगाजत होईल, असे सांगितलं आहे.
तसेच गोगावले यांनी युतीबाबत बोलताना, दोन भावांची युती झालीय, मनोमिलन झालं, एकत्रिकरण झालेलं आहे. आता राजकीय युतीबाबत बोलायचं झालं तर मुंबईसह नाशिक, कल्याण-डोंबिवली, ठाणे या महापालिकांबाबतच्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणच्या चर्चा संपल्याचेही म्हटलं आहे.
राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्यात सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसह राज ठाकरेंच्या मनसेवर हल्लाबोल सुरू केला आहे. याचदरम्यान कोकणातील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यांनी, त्यांची युती होवो, आघाडी होवो आम्हाला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. त्याचा आम्हाला काही फरक देखील पडणार नाही.
कारण आताच झालेल्या निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून आमची ताकद दाखवून दिली आहे. काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी वन मॅन शो म्हणून लढत दिली. या लोकांना दाखवून दिलं आहे. पण या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने काहीच फायदा होणार नसून लोकांनाच आता ते का एकत्र येत आहेत, हे कळत आहे. ते कालपर्यंत काय बोलत होते आज काय बोलत आहेत. याची प्रचिती जनतेला झालेली आहे. त्यामुळे या गोष्टीचा आम्हाला काही फरक पडणार नाही.
तर आता हे ठाकरे बंधू गेल्या २० वर्षानंतर एकत्र येत असल्याने त्यांना शुभेच्छा. ते एकत्र येत आहेत. ते दोघे भाऊ आहेत. ते एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे. आता ते एकत्र येत असतील तर चांगलं राहावं, आनंदीत राहावं, सुखानं राहावं. पण सध्या हे दोघे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत असल्याची चर्चा आहे. यावरही गोगावले यांनी खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, कोणालाही एकत्र येताना काही कारणं द्यावं लागतात. आता हे देखील मराठीचा मुद्दा सांगत असावेत असेही गोगावले यांनी म्हटलं आहे.
1. ठाकरे बंधूंची युती कधी जाहीर होणार आहे?
खासदार संजय राऊतांच्या ट्वीटप्रमाणे काही तासांत घोषणा होण्याची शक्यता आहे.
2. ही युती कोणत्या पक्षांमध्ये होणार आहे?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे (राज ठाकरे) यांच्यात युती होण्याची चर्चा आहे.
3. या युतीचा उद्देश काय आहे?
आगामी महापालिका निवडणुकांसाठी संयुक्त रणनीती आखण्याचा उद्देश आहे.
4. शिंदे शिवसेना आणि भाजपची प्रतिक्रिया काय आहे?
या युतीवरून शिंदे शिवसेना व भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे.
5. भरत गोगावले यांनी काय प्रतिक्रिया दिली?
शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी ठाकरे बंधूंना शुभेच्छा दिल्या असून त्याची मोठी चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.