Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिकेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी प्रशासन स्थायी समितीसमोर थेट मंजुरीसाठी आणत असलेल्या प्रस्तावावर आक्षेप घेतला आहे.
यामुळे शेकडो कोटींचे 36 हून अधिक विषय स्थायी समितीने ‘नॉट टेकन’ (नाकारले) केले. अशा कारभारामुळे महापालिकेच्या प्रशासनावर नगरसेवकांना वेगळीच संशय व्यक्त करू लागले आहे. प्रशासनाच्या अशा कारभारामागे कुणा मोठ्या राजकीय नेत्याचा हात तर नाही ना? अशी दबक्या आवाजात चर्चा रंगली आहे.
कोणतीही पूर्वकल्पना न देता शेकडो कोटींचे प्रस्ताव थेट मंजुरीसाठी आणण्याच्या महापालिका प्रशासनाच्या (Municipal Corporation) मनमानी कारभारावर स्थायी समितीने कठोर कारवाई केली. नियमांची पायमल्ली करून आणलेले 36 हून अधिक विषय स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी ‘नॉट टेकन’ (नाकारले) करीत प्रशासनाला मोठा दणका दिला. तसेच गेल्या तीन वर्षांत झालेल्या कामांचे तातडीने त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करण्याचे कडक निर्देश दिले.
बैठकीच्या सुरुवातीलाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे (Shivsena UBT) नगरसेवक यशोधर फणसे यांनी वाढीव किमतीचे प्रस्ताव थेट मंजुरीसाठी आणल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनीही महत्त्वाचे विषय स्थायी समितीला अंधारात ठेवून सादर करणे चुकीचे आहे, असे सांगत प्रशासनाला धारेवर धरले.
सर्वपक्षीय नगरसेवकांचा संताप पाहून अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. ‘दर बैठकीत 25 ते 30 प्रस्ताव कोणतीही माहिती न देता आणले जातात. कलमांचा गैरवापर करून विशिष्ट ठेकेदारांचे भले केले जात आहे. कागदावर दाखवलेली अनेक कामे प्रत्यक्षात सुरूच नाहीत,’ असा थेट आरोप त्यांनी केला.
यापूर्वी 5474 कोटींचे प्रस्ताव असेच आणले गेले होते, याबाबतची आठवण करून देत अध्यक्षांनी प्रशासनाला तीव्र शब्दांत खडसावले. या वेळी अध्यक्षांनी पारदर्शकतेचा अभाव असल्याने सर्व प्रस्ताव थेट नाकारले.
त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांतील कामांची त्रयस्थ संस्थेकडून सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले. इतकेच नाही तर प्रशासनाचा मनमानी कारभार न थांबल्यास कठोर कारवाईचा इशाराही या वेळी शिंदे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.