Mumbai News, 12 Apr : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आतापासूनच रणनीती आखायला सुरूवात केली आहे. यासाठी नुकतंच उद्धव ठाकरेंनी पक्षाचे प्रवक्ते आणि काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत.
अशातच आता त्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, मुंबईतील (Mumbai) लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यामुळे मुंबई महापालिकेच्या दृष्टीने ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. तसंच ठाकरेंनी साळवींना निष्ठेचं फळ दिल्याचंही बोललं जात आहे. कारण साळवी हे मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवडी विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी उत्सुक होते.
यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग देखील लावली होती. मात्र, ठाकरेंनी त्यांना डावलून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना तिकीट दिलं. ठाकरेंच्या निर्णयामुळे सुधीर साळवी यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. आक्रमक कार्यकर्त्यांनी साळवींच्या लालबागमधील त्यांच्या कार्यालयासमोर शक्तीप्रदर्शन देखील केलं होते.
तर पक्षाने डावलल्यामुळे साळवी पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. मात्र, ठाकरेंनी साळवेंना मातोश्रीवर बोलावून समजूत काढली. त्यानंतर सुधीर साळवी हे ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले होते. त्यामुळे आता त्यांच्यावर सचिवपदाची जबाबदारी सोपवून पक्षाने त्यांच्या निष्ठेचे फळ दिल्याचं दिसत आहे.
दरम्यान, लालबाग परिसर हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे सुधीर साळवी यांच्याकडे पक्षाचे सचिवपद देत ठाकरेंनी बालेकिल्ला सेफ करण्यासाठी डाव टाकल्याचंही बोललं जात आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.