School Bus Tree Fall Sarkarnama
मुंबई

School Bus Tree Fall : चेंबूर स्कूल बस दुर्घटना : 11 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी 7 लाख दंडाची शिफारस; महापालिकेच्या अजब अहवालावर सर्वपक्षीय आक्षेप

BMC report sparks controversy after officials receive clean chit in Chembur school bus tragedy : मुंबई महापालिकेच्या चौकशी समितीने रस्ते व उद्यान विभागाला क्लीन चिट; महापौर रितू तावडे, चित्रा वाघ, किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध पक्षांकडून अहवालावर प्रश्नचिन्ह

Pradeep Pendhare

Mumbai Municipal Corporation : मुंबईतील चेंबूर येथे स्कूल बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालेल्या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या चौकशी समितीने कंत्राटदार कंपनीला पाच लाख आणि सल्लागार कंपनीला दोन लाख रुपये दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे.

मात्र, या अहवालात महापालिकेच्या रस्ते आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरलेले नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर सर्वपक्षीय आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

आयुक्त अश्विनी भिडे यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार, (Mumbai) चेंबूर परिसरात रस्ते आणि गटारांच्या कामादरम्यान पिंपळाच्या झाडाच्या मुळांना इजा झाल्यामुळे झाड स्कूल बसवर कोसळल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. समितीने कंत्राटदार कंपनीवर पाच लाख आणि सल्लागार कंपनीवर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस केली असून, रस्ते व उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली आहे.

या अहवालानंतर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका विद्यार्थ्याच्या (Student) मृत्यूप्रकरणी केवळ सात लाख रुपयांच्या दंडाची शिफारस करण्यात आल्याने जबाबदारी निश्चित करण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

महापौर रितू तावडे यांनी अहवालावर सार्वजनिक आक्षेप नोंदवत तो फेटाळून लावण्याची भूमिका घेतली. मुंबईतील वाढत्या काँक्रीटीकरणामुळे झाडांच्या मुळांवर परिणाम होत असल्याचे नमूद करत, केवळ कंत्राटदारावर कारवाई करून प्रकरण संपणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदारीचीही चौकशी व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

पेडणेकरांकडून SIT चौकशीची मागणी

भाजप आमदार चित्रा वाघ यांनी अहवालावर नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी चौकशी अहवालाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. मनसे नेते संदीप देशपांडे आणि काँग्रेस गटनेते अशरफ आजमी यांनीही उद्यान विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, या प्रकरणावरून महापालिका प्रशासनावर राजकीय दबाव वाढला असून आयुक्त अश्विनी भिडे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाने शहरातील धोकादायक झाडांच्या सुरक्षेसाठी नव्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असले, तरी चौकशी अहवालात अधिकाऱ्यांना दिलेल्या क्लीन चिटमुळे या प्रकरणावरील वाद अधिक तीव्र झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT