

Raigad Breaking News : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात असलेल्या जेएनपीए (JNPA) बंदरातील न्हावा शेवा पोर्ट टर्मिनलवर सोमवारी सकाळी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गंभीर दुर्घटना घडली.
जहाजावरील कंटेनर उतरवण्याचे काम सुरू असताना, हवेच्या जोरानं कंटेनर कोसळला अन् त्याबरोबर तीन कामगार उडाले गेले. या तीन कामगारांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यातील एका कामगारांचा मृत्यू झाल्याची समोर माहिती आली आहे.
घटनेनंतर बंदर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमी कामगारांना (Worker) तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.
रायगडमधील (Raigad) या दुर्घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कंटेनरखाली अडकलेले कामगार दिसत असून, परिसरातील कर्मचारी मदतीसाठी धाव घेताना आणि बचावकार्य सुरू असल्याचे दिसते. मात्र, व्हायरल व्हिडिओची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.
मुंबई, रायगड, ठाणे, कोकण आणि पुणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. उरण तालुक्यातही सोमवारी सकाळपासून जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्याचा प्रभाव जाणवत आहे. प्रतिकूल हवामानामुळे बंदरातील कामकाजावर परिणाम झाला.
प्रतिकूल हवामान आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव बंदर प्रशासनाने काही मरीन तसेच क्वेशाईड ऑपरेशन्स तात्पुरते स्थगित केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच जहाजांच्या हालचालींवरही तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेतील दोन जखमींपैकी एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. बंदरातील सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत काही कामगारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, या संदर्भात संबंधित प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.