Aaditya Thackeray, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray : उत्तर भारतीयांसमोर बोलतानाच आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना डिवचलं; म्हणाले, "भाजप-मनसेची सेटिंग..."

Shivsena UBT's Marathi Pathshala : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मुंबईत आपल्या पक्षाची सत्ता कशी येईल यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी आता मुंबईतील सर्व मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व पक्षांकडून वेगवेगळी रणनीती आखली जात आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 13 Apr : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मुंबईत आपल्या पक्षाची सत्ता कशी येईल यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी आता मुंबईतील सर्व मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व पक्षांकडून वेगवेगळी रणनीती आखली जात आहे.

मुंबईतील मराठी माणसांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मुंबईतच मराठी बोललंच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. यासाठी मनसैनिकांनी थेट बँकेत जाऊन जे कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलायला नकार दिला, त्यांना मारहाण देखील केली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज देताच मनसेने बँकेत जाऊन मराठीचा आग्रह करणं बंद केलं.

एकीकडे राज ठाकरे मराठीचा मुंबईत आग्रही धरत मराठी माणसांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने थेट उत्तर भारतीयांसाठी 'मराठी पाठशाला' हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कांदिवलीमधील याच मराठी पाठशाला कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे आणि भाजपवर हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, जेव्हा देशात कोरोनाचं संकट आलं होतं. तेव्हा अनेकांना आपल्या घरी जायचं होतं. तेव्हा उत्तर भारतीयांचे हाल झाले. अनेक जण रस्त्याने पायी गेले. मात्र, तेव्हा केंद्राने किंवा यूपी, बिहार सरकारने तुमचा आवाज ऐकला नाही. तर तेव्हा उद्धव ठाकरेंनी तुमचा आवाज ऐकला. त्या संकटाच्या काळाच ते म्हणाले होते की, तुम्ही घाबरून जाऊ नका हे पण तुमचंच गाव आहे.

मात्र, त्यावेळी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी कोणालाही आत येऊ देऊ नका असे आदेश दिले होते, अशी आठवण आदित्य यांनी उत्तर भारतीयांना करून दिली. तसंच मराठीचा अपमान करणाऱ्यांना त्याची प्रतिक्रिया मिळतेच, पण ज्यांना मराठी शिकायचे आहे, त्यांच्यासाठी मी एक शाळा घेतली आणि या उपक्रमात मी त्यांचे मनापासून स्वागत करतो."

तर त्यांनी तुम्ही जिथे जाल तिथली मातृभाषा तुम्हाला आलीच पाहिजे असंही स्पष्ट केलं. ते म्हणाले, अनेक लोक मुंबईला कर्मभूमी आणि मराठीला मातृभाषा मानतात. पण प्रत्येकाला त्यांची मातृभाषा माहीत असली पाहिजे.

तुम्ही ज्या राज्यात जाल त्या राज्यातील लोकांचा आदर केला पाहिजे आणि तुम्हाला तिथली भाषा देखील अवगत पाहिजे. दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरेंनी मनसे आणि भाजपवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, "मनसे ही भाजपची बी टीम आहे. भाजप आणि मनसेची सेटिंग आहे ते सेटिंग करणारे आहेत, त्यांना मी उत्तर देत नाही."

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT