Congress News Sarkarnama
मुंबई

Mumbai Congress News : देवरा, सिद्दीकींनंतर मुंबईत काँग्रेसला तिसरा मोठा झटका; 'हा' नेता शिंदे गटाच्या वाटेवर ?

Political News : मुंबईतील महाविकास जागावाटपाचा तिढा न सुटल्यामुळे आता काँग्रेसला मोठा झटका बसणार आहे. मुंबईतील काँग्रेसचा एक बडा नेता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे समजते.

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उमेदवारी न मिळाल्याने सर्वच पक्षात बंडखोरी केली जात आहे. त्यामुळे या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महायुती व महाविकास आघाडीतील जागा वाटपापूर्वीच मतभेद असल्याचे पुढे आले आहे. मुंबईतील महाविकास जागावाटपाचा तिढा न सुटल्यामुळे आता काँग्रेसला मोठा झटका बसणार आहे. मुंबईतील काँग्रेसचा एक बडा नेता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे समजते.

महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन अजून मतभेद असल्याचे समोर आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर केली. उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषित केल्याने महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते व माजी खासदार संजय निरुपम यांनी पक्षाला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे हा नेता येत्या काळात शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे समजते. काँग्रेस नेते संजय निरुपम हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. (Mumbai Congress News )

संजय निरुपम हे आधी शिवसेनेतच होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे ते आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

माझ्याकडे पर्यायांची कमतरता नाही. मी आठवडाभर वाट बघेन आणि मग निर्णय घेईन. उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज होते. मी खिचडी चोरचा प्रचार करणार नाही, अशा शब्दात माजी खासदार संजय निरुपम यांनी इशारा दिला होता.

मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी तिकीट वाटपावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला असून त्यांच्याच पक्षावरही निशाणा साधला आहे.लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. कारण काँग्रेस नेते संजय निरुपम हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केल्याने नाराजी

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने (Shivsena) 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषित केल्याने महाविकास आघाडीत चुरस सुरू झाली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षाला अल्टिमेटम दिला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केल्याने नाराजी व्यक्त केली होती.

SCROLL FOR NEXT