Baba Siddique Murder Case: Sarkarnama
मुंबई

Baba Siddique Murder Case: राष्ट्रवादी नेत्याची हत्या, मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या; पंजाब पोलिसांची कारवाई

Mumbai Crime News Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत हत्या करण्यात आली. त्यांच्या पोटात दोन आणि छातीवर दोन गोळ्या लागल्या.

Mangesh Mahale

Mumbai News: मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची सहा महिन्यापूर्वी मुंबईतील वांद्रे येथील खेर वाडी सिग्नल येथे हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांची हत्या करणारा प्रमुख आरोपीच्या पंजाब पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

पंजाबमध्ये झिशान अख्तर याला अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरु आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात फरार आरोपी म्हणून झिशान अख्तर याचे नाव समोर आले होते. मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते.

बाबा सिद्दीकी प्रकरणात पोलिसांनी तब्बल 4 हजार 590 पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल केले आहे. आरोपींच्या चौकशीची महत्वाची माहिती समोर आली आहे. आरोपींना त्यादिवशी सिद्दीकींचा हत्या करता आली नसती तर त्यांनी हत्येचा प्लॅन सोडून दिला असता, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, तसे झाले नाही.त्यादिवशी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा प्लॅन फसला असता तर पुन्हा असा प्रयत्न झाला नसता, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी आरोपींनी सिद्दीकी आणि त्यांच्या कार्यालयाची रेकी केली होती. हल्लेखोरांची तीन ते चार वेळा रेकी केल्याचे पोलिस तपासात आढळले आहे. आरोपी हे रेकी करीत असताना स्वत:जवळ बॅगेत पिस्तूलही घेऊन यायचे. संधी मिळेल तेव्हा हल्ला करण्याचे त्यांचा विचार होता, असे आरोपपत्रात नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT