Aryan khan
Aryan khan Sarkarnama
मुंबई

NCB कडून आर्यन खानची साडेपाच तास कसून चैाकशी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील (Mumbai Cruise Drugs Party) जामीनावर असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याची काल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईच्या कार्यालयात विशेष तपास पथकाकडून (SIT) तब्बल साडेपाच तास कसून चौकशी करण्यात आली. काल रात्री ११ :४० वाजता आर्यन खान एनसीबी (NCB) कार्यालातून बाहेर पडला. यावेळी तो आपल्या वकिलांसह एनसीबी कार्यालयात आला होता.

मुंबईत कार्डिलिया क्रूझवर (Mumbai Cruise Drugs Party)ज्या दिवशी कारवाई करण्यात आली त्या दिवशी नेमकं काय झालं या बाबतची चौकशी NCB च्या एसआयटी टिमने केल्याची सूत्रांची माहिती दिली. दुसरीकडे या प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने एनसीबीकडे सलग दोन दिवस येऊन जबाब नोंदवला. प्रभाकर साईलच्या जबाबामुळे एनसीबीच्या तपासाला वेग आला आहे.

या प्रकरणातील दुसरा पंच के .पी. गोसावीचा ताबा मिळवण्यासाठी एनसीबी न्यायालयात दाद मागणार आहे. काल एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडताना आर्यन सोबत संवाद साधण्यासाठी माध्यमांची मोठी गर्दी केली होती. मात्र, यावेळी आर्यनने माध्यमांना टाळले. सध्या आर्यन खान जामिनावर बाहेर आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात जवळपास महिनाभर आर्यन आर्थर जेलमध्ये होता.

आज आर्यन खानचा ( 13 नोव्हेंबर ) वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच त्याला तपास यंत्रणेला सामोरे जावे लागले. या संपूर्ण चौकशी फेऱ्यांमुळे आर्यनचा वाढदिवस यंदा साधेपणानेच साजरा केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आर्यन जरी जामिनावर बाहेर असला तरी, मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर करताना त्याला 14 अटी घालण्यात आल्या आहेत. त्यातील एक प्रमुख अट म्हणजे दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत त्याला एनसीबी कार्यालयात हजेरी लावायला सांगितले आहे. त्यानुसार काल शुक्रवारी आर्यन NCB कार्यालयात आला होता. कार्यलयातून बाहेर पडताना आर्यन सोबत संवाद साधण्यासाठी माध्यमांची मोठी गर्दी केली होती. मात्र, यावेळी आर्यनने माध्यमांना टाळले.

मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणानंतर किरण प्रकाश तथा के. पी. गोसावी (वय ३६, रा. ठाणे) हा सध्या पुणे लष्कर पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने या ड्रग प्रकरणात सुपरस्टार शाहरूख खान याच्याकडून १८ कोटी खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा डाव त्याच्या एका सेल्फीमुळे फसला. त्यानंतर अशाप्रकारे मुंबई,ठाणे,पुणे येथे फसवणुकीचे गुन्हे त्याने केल्याचे समजले. आखाती देशात नोकरीचे आमिष दाखवून किरण गोसावीने (Kiran Gosavi) भोसरीतील (Pimpri Chinchwad) एका तरुणाला सव्वादोन लाख रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण आता समोर आले आहे. त्याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा गुरुवारी (ता.११) दाखल करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT