Kabutarkhana dispute Dadar : उच्च न्यायालयाने दादर इथला कबुतरखाना बंद करण्याचा आदेश दिला आहे. महापालिकेकडून त्याबाबतची अंमलबजावणी केली जात असली, तरी काही लोकांकडून न्यायालयाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.
दादरच्या जैन मंदिराशेजारील एका इमारतीच्या छतावर दाण्याची पोती टाकली जात आहेत. तिथे हजारो कबुतरे जमा होत असून, त्याचा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. न्यायालया आदेश मान्य न करणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मराठी एकीकरण समिती आज मैदानात उतरल्याने हा वाद अधिकच पेटला आहे.
या प्रकाराविरोधात मराठी एकीकरण समिती मैदानात उतरली असून, आज गोवर्धन देशमुख यांनी जाब विचारण्यासाठी रवाना झाले आहेत. यामुळे दादर इथं मोठा पोलिस (Police) बंदोबस्त वाढवला आहे. यामुळे परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे. राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी देखील इथं पोलिस बंदोबस्तात सहभागी झाली आहे. दरम्यान, इथं असलेल्या जैन मंदिराचा मुख्य दरवाजा सकाळपासून बंद ठेवण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई (Mumbai) महापालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर कारवाई केली. काही दिवसांपूर्वी पालिकेने हा कबुतरखाना पोलिसांच्या सुरक्षेत चारही बाजूंनी ताडपत्री बांधून बंदिस्त केला. तिथं कबुतरांना खाद्य घातल्यास कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला.
महापालिकेच्या या कारवाईविरोधात जैन समुदायाने आक्रमक होत तीव्र विरोध केला. त्यानंतर झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर सोमवारी पालिकेने कबुतरखाना पुन्हा बंदिस्त केला आहे.
न्यायालयाच्या सुधारित आदेशाचे उल्लंघन करीत जैन मंदिराजवळील इमारतीच्या छतावर काही लोक अनधिकृतपणे कबुतरांना दाणे टाकत आहेत. कबुतरांमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. तसेच न्यायालयीन आदेशाचा उघडपणे उल्लंघन होत असून, प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात मराठी एकीकरण समितीनं उडी घेतली असून, या प्रकरणात आक्रमक झालेल्या जैन मुनींना हिंसेची भाषा वापरली. हत्यार उगारणार असल्याचे बोल सुनावलं. याला उत्तर देण्यासाठी मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करत आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे दादर इथं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
दादर शहरात पोलिस आयुक्तांनी जमावबंदी आदेश लागू आहेत. त्याचे उल्लंघन करणारा मोर्चा काढू नये. या आदेशाचे उल्लंघन करून मोर्चा काढला आणि त्यातून अनुचित घटना किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास सर्वस्वी जबाबदार धरले जाईल, अशी सूचना देणारी नोटीस पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बजावली आहे. पण मराठी एकीकरण समिती आंदोलनावर ठाम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.