Mahesh Sawant vs Sada Sarvankar : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दादर-माहिमचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या विधानाने नवीन वादाला तोंड फुटले आहे. मी आमदार नसताना 20 कोटी रुपये निधी मिळतो, असे विधान सदा सरवणकर यांनी केले असून, याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार महेश सावंत आक्रमक झाले आहेत.
ठाकरे यांच्या या शिलेदाराने सदा सरवणकर यांच्याविरोधात लेखी तक्रारीची तयारी केली आहे. त्यामुळे सरवणकर अन् सावंत यांच्यातील राजकीय संघर्ष पुढील काळात अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत आहे.
विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर अन् महेश सावंत यांच्यातील लढत राज्यात गाजली. दादर-माहीम हा ठाकरे यांचे बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेना (Shivsena) फुटीनंतर इथं ठाकरे की, एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व राहणार याची उत्सुकता होती. परंतु जनतेने शिवसेना ठाकरे सेना पक्षाला कौल दिला अन् महेश सावंत यांना विजयी केले.
सदा सरवणकर यांचा पराभव झाला तरी, ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत सक्रिय आहेत. मतदारसंघात वेगवेगळ्या कामांवर भर देताना जनसंपर्क ठेवून आहेत. यातच त्यांनी मतदारसंघातील एका बैठकीत मिळणाऱ्या निधीवर भाष्य केले. 'एका आमदाराला मिळतात दोन कोटी आणि मी आमदार नसताना 20 कोटी रुपये निधी मिळतो,' असे जाहीर विधान सरवणकर यांनी केले.
सदा सरवणकर यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरवणकर यांच्या यांच्या या विधानानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार महेश सावंत यांनी 'हा दादर-माहीममधील जनतेचा अपमान' असल्याचा घणाघात केला आहे.
आमदार सावंत यांनी संताप आणि पलटवार करताना जोरदार टीका केली. या निधीबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे आमदार सावंत यांनी म्हटले आहे.
आमदार सावंत म्हणाले, "त्यांनी 20 ते 40 वर्षे सत्ता उपभोगली. त्यांना विकास कामासाठी 200-300-500 कोटींचा निधी मिळाला, तो गेला कुठे? त्यांचे माजी आमदार म्हणून मानधन बंद झाले." त्यामुळे 20 कोटी निधी हा त्यांना वैयक्तिक विकासासाठी मिळत असेल तर आम्हाला आमदार म्हणून जनतेच्या विकासकामांसाठी 40 कोटी तरी निधी मिळायला हवा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.