MNS Raju Patil Sarkarnama
मुंबई

Kunal Kamra Inauguration Controversy : 'मनसे'नं उद्घाटनाला कुणाल कामराला बोलावलं; सत्ताधाऱ्यांना झोंबणारी पोस्टरबाजी, नेमकं काय आहे प्रकरण?

MNS Raju Patil Palava Bridge Dombivli comedian Kunal Kamra inauguration : डोंबिवलीमधील मनसेचे नेते राजू पाटील यांनी कल्याण शीळ रस्त्यावरील पलावा पुलाच्या संथगतीच्या कामावरून सत्ताधाऱ्यांवर टीका उपाहासात्मक फलक लावले आहेत.

Pradeep Pendhare

Mumbai Dombivli Palava Bridge : डोंबिवलीमधील संथगतीच्या विकास कामांवरून नेते राजू पाटील यांनी 'मनसे स्टाईल'ने सत्ताधाऱ्यांना डिवचलं आहे. सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागेल, अशी परिसरात उपाहासात्मक पोस्टरबाजी केली असून, ती चर्चेचा विषय बनली आहे. ॉ

सत्ताधाऱ्यांकडून संथगतीने सुरू पलावा पुलाच्या कामाच्या उद्घाटनला काॅमेडियन कुणाल कामरा याला आणणार असल्याचं उपाहासात्मकपणे पोस्टरवर म्हटलं आहे. मनसेची ही पोस्टरबाजी सत्ताधाऱ्यांना खिजवणारी ठरली असून, मुंबईत चर्चेचा विषय ठरली आहे.

डोंबिवलीतील कल्याण-शीळ रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन्ही पलावा पुलाचे काम सुरू झाले असून अनेक वर्षांपासून हे काम सुरू आहे. अतिशय संथगतीने सुरू असलेल्या या कामावरून मनसे (MNS) नेते राजू पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं.

मनसे नेते राजू पाटील यांनी काम सुरू असलेल्या पुलाच्या समोर भला मोठा एक बॅनर लावला आहे. या पुलाचे उद्घाटन 31 एप्रिलला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या हस्ते होणार आहे, असे लिहिले सत्ताधाऱ्यांना खिजवलं आहे. एवढेच नव्हे, तर तारखांच्या आश्वासनांनी फुल्ल! कधी होणार पलावा पूल? की बनत होता, बनत आहे आणि बनतच राहील पलावा पूल? असा सवाल देखील केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ही पोस्ट 'एक्स' खात्यावर राजू पाटलांनी टॅग केली आहे.

कल्याण-शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक, नागरिक, शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागतं. अनेकदा वाहतूक कोंडीमुळे शाळांनी अनेकदा सुट्टी देखील दिली आहे. या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. पलावा जंक्शन येथे दोन पुलांचे काम सुरू आहे. या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडीमधून नागरिकांची सुटका होईल.

मनसे नेते राजू पाटील यांनी पुलांच्या कामासंदर्भात वारंवार पाठपुरावा करत आहेत. आता तर मनसे नेते राजू पाटील यांनी कल्याण-शीळ रस्त्यावर पुलाचा बाजूला एक भला मोठा बॅनर लावला आहे. हा बॅनर एक एप्रिलला लावण्यात आला आहे. लोक या दिवशी एप्रिल फूल करून अनेकांची खिल्ली उडवितात. पलावा पुला संदर्भात राजू पाटील यांनी देखील प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी एक उपहासात्मक बॅनर लावून खिल्ली उडवली आहे.

या बॅनर वर लिहिले गेले आहे. तारखांच्या आश्वासनांनी फुल्ल! कधी होणार पलावा पुल? एवढेच नाही तर ३१ एप्रिल रोजी या पुलाचे उद्घाटन देखील होणार आहे आणि चर्चेत असलेले स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या हस्ते हा उद्घाटन होणार असल्याचे लिहिलं आहे. त्यामुळे हा बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT