Mumbai Police Launch Immediate Combing Operation : भारत आणि पाकिस्तानमध्ये गुरूवारी रात्रभर धुमश्चक्री झाली. एलओसीला लागून असलेल्या भागात पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आला. जवळपास 15 ठिकाणी झालेल्या या हल्ल्याला भारताच्या एस-400 या एअर डिफेन्स सिस्टीमने नेस्तनाबूत केले. तसेच भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर या युध्दनौकांनी कराची बंदरावर हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. सीमाभागात या घडामोडी घडत असताना मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ पहाटे संशयास्पदरीत्या हवेत फिरताना ड्रोन दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. साकीनाका परिसरात हे ड्रोन फिरत असल्याचे पाहिल्यानंतर नागरिकांमध्य खळबळ उडाली. सहारा विमानतळ परिसरातील नागरिकांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिल्यानंतर तातडीने ड्रोनचा शोध सुरू करण्यात आला.
साकीनाका पोलिसांकडून तातडीने कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. त्यासाठी विविध पथके करण्यात आल्याची माहिती आहे. सकाळी सव्वा पाच वाजता साकीनाक्यातील हजरत तय्यद जलाल (बैगन शाहा दर्गा) मशिदीच्यावर ड्रोन घिरट्या घालत असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. ड्रोन त्यानंतर झोपडपट्टी परिसरात नाहीसा झाल्याचा दावाही नागरिकांनी केला.
ड्रोन उडवणाऱ्याचा शोध लावण्यासाठी पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन केले. अद्याप या ड्रोनबाबत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. दरम्यान, पाकिस्तानच्या कुरापती वाढल्याने मुंबईतही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात भारतीय नौदल सक्रीय झाले आहे. मच्छिमारांना नौदलाने सतर्क केले असून प्रतिबंधित क्षेत्रात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईतील चौपाट्यांवरही सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आल्याचे समजते. नागरिकांना चौपाटीवर न जाण्याचे आवाहनही पोलिसांकडून केले जात आहे. सध्यातरी एलओसीवर प्रचंड तणाव असून पाकिस्तानकडून काही भागात गोळीबार सुरूच आहे. भारतीय सैन्यांकडून त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. असे असले तरी मुंबईसह देशभरातील प्रमुख महानगरांमध्य अलर्ट देण्यात आला असून सर्व प्रमुख ठिकाणांची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.