Malegaon News: सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा केला. मात्र मालेगाव मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. यामध्ये आजी-माजी आमदार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीचे वेध येथील सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांना लागले आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर राजकीय जुळवा जुळवा देखील झाली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल हे एमआयएम पक्षासाठी ताकद पणाला लावणार आहेत.
माजी आमदार आसिफ शेख यांनी शहरात बांगलादेशी नागरिक, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांना उत्तरे यांसह स्थानिक समस्यांवर अत्यंत आक्रमक आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी लगेचच महापालिका निवडणुकीवर लक्ष्य केंद्रित केले होते.
मावळत्या महापालिकेत माजी आमदार (कै) रशीद शेख हे काँग्रेसच्या माध्यमातून सत्तेत होते. त्यांनी चक्क शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळवला होता. शिवसेना आणि भाजपच्या पाठिंबावर काँग्रेस येथे सत्तेत राहिले. त्यामुळे राज्यात लोकसभा आणि विधानसभेला झालेली आघाडी काही वर्ष आधीच मालेगाव महापालिकेत प्रत्यक्षात आली होती.
देशाच्या राजकारणात काँग्रेस शिवसेना आणि भाजपला राजकीय शत्रू मानते. त्यांच्याशी कधीही जुळवून घेतले जात नाही. मालेगाव त्याला अपवाद ठरला. ज्याचे देशभर बावडे तोच मालेगाव मध्ये सत्तेसाठी आवडे अशी स्थिती झाली.
सध्या मात्र माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात होते. मात्र मालेगावच्या नागरिकांना भारतीय जनता पक्षाचे वावडे असल्याने आणि अजित पवार हे भाजपसोबत असल्याने माजी आमदार शेख यांना नाईलाजास्तव अजित पवार यांची साथ सोडावी लागली. मात्र तो शिक्का ते पुसू शकलेले नाही.
सध्या माजी आमदार शेख यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे मुश्तकीन डिग्निटी, काँग्रेसचे एजाज बेग व अन्य काही नेते एकत्र आले आहेत. एमआयएम चे आमदार मौलाना मुफ्ती यांच्या विरोधात ही सर्व जुळवा जुळवा सुरू आहे. यामध्ये शहराच्या पश्चिम भागात मात्र हिंदू बहुल मतदार आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि भाजपचे सुनील गायकवाड यांचे या भागात वर्चस्व आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष या भागात आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत.
नवीन लोकसंख्या निकषानुसार मालेगाव महापालिकेचे नगरसेवक ८४ वरून ९५ झाले आहेत. अशा परिस्थितीत मालेगाव शहरातील मुस्लिम बहुल भागात माजी आमदार शेख आणि विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती यांच्यात तुळशीची लढत होईल. त्यात दोन्ही तुल्यबळ ठरल्यास त्यांना भाजप आणि शिवसेनेची मदत घ्यावी लागेल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर ज्यांना देशभर आणि राज्यभर भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष ही नव्हतो ते कोणत्या पक्षाला पाठिंबा देऊन सत्तेत आणतात याची उत्सुकता आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.