Mumbai Mayor Ritu Tawde inspects waterlogged areas after heavy rainfall as a civic worker falls into an open manhole, triggering a major controversy and investigation. Sarkarnama
मुंबई

Ritu Tawde : पावसाळी गटारात मुद्दाम पडून कर्मचाऱ्याने आणलं अडचणीत? मुंबईच्या महापौरांना दाट संशय, थेट चौकशीच लावली

Mumbai Rain Incident : मुंबईत बुधवारी मुसळधार पावसाने हजरी लावली. पावसात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर चौफेर टीका करायला सुरूवात केली. याच पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वकाही सुरळीत असल्याचा दावा करत महापौर रितू तावडे या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाहेर पडल्या होत्या.

Jagdish Patil

Mumbai News, 26 Jun : मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं. याच पावसामुळे मुंबईतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर रितू तावडे गांधी मार्केट येथे आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासमोरच पालिकेचा एक कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली होती.

यावरून महापौरांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं. तर आता कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्याची घटना महापौरांना संशयास्पद वाटत असल्यामुळे या घटनेची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात महापौरांनी चौकशीचे आदेश देखील दिले आहेत.

मुंबईत बुधवारी मुसळधार पावसाने हजरी लावली. पावसात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर चौफेर टीका करायला सुरूवात केली. याच पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वकाही सुरळीत असल्याचा दावा करत महापौर रितू तावडे या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाहेर पडल्या होत्या.

महापौर पाहणी करत असतानाच मनपाचा मुकादम उघड्या मॅनहोलमध्ये पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे पालिकेचं पितळ उघडं पडल्याची टीका होऊ लागली. शिवाय या घटनेमुळे सत्ताधारी भाजपची मोठी नाचक्की देखील झाली. आता याच घटनेबाबत महापौरांना काही बाबी संशयास्पद वाटत असल्याने त्यांनी चौकशीचे आदेश दिलेत.

महापौरांना का आला संशय?

मिळालेल्या माहितीनुसार, गांधी मार्केटमध्ये ज्या ठिकाणी ड्रेनचं चेंबर उघडं होतं त्या ठिकाणी आधीच बॅरिकेटिंग लावण्यात आलं होतं. त्यामुळे नागरिक आणि कर्मचारी त्या भागातून न जाता बाजूने फिरून जात होते. मात्र संबंधित मुकादमाने बॅरिकेटिंग बाजूला करून नेमका त्याच ठिकाणाहून प्रवेश केला.

शिवाय जर तो मुकादम त्या कामाशी संबंधित होता, तर त्याला चेंबर उघडं असल्याची माहिती असणे अपेक्षित होते. त्यामुळे बॅरिकेटिंग असूनही तो त्या ठिकाणी का गेला? आणि आणि तेथे बॅरिकेड्स लावण्यात आलेले असतानाही तो त्यात कसा पडला? असा संशय महापौरांनी व्यक्त केला आहे.

त्यामुळे आता या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौरांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता नाल्यात पडलेल्या कर्मचाऱ्यावर पालिका कारवाई करणार का? त्याने हे मुद्दाम केलं की तो खरंच त्या नाल्यात पडला? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT