Siya Goyal : "मी खूप श्रीमंत, कुठेही गेलीस तरी..."; माझा लग्नाला विरोध पण केतनचा दबाव; चौकशीत सियाचा धक्कादायक खुलासा

Ketan Agrawal Murder Case : एकीकडे संपूर्ण राज्यभरात सियाला जर लग्न मान्य नव्हतं तर तिने तसं स्पष्ट सांगायचं केतनचा जीव घेण्याची काय गरज होती? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच आता तिने आपणाला हे लग्न करायचं नसल्याचं केतनला सांगितल्याचं म्हटलं आहे.
Siya Goyal, accused in the Ketan Agrawal murder case
Siya Goyal, accused in the Ketan Agrawal murder case, during police investigation. The latest revelation has brought a new twist to this high-profile Pune crime case.Sarkarnama
Published on
Updated on

Ketan Agrawal Murder Case : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या सिया गोयलने पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे. मी केतनला मला हे लग्न करायचं नाही असं सांगितलं होतं.

मात्र, तो लग्न करण्यावर ठाम होता. शिवाय आता लग्न मोडू शकत नाहीस तू कुठेही गेलीस तरी तुला शोधून काढू, असं केतन म्हणाल्याचा दावा सियाने पोलिसांसमोर केला आहे. सियाच्या या दाव्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. एकीकडे संपूर्ण राज्यभरात सियाला जर लग्न मान्य नव्हतं तर तिने तसं स्पष्ट सांगायचं केतनचा जीव घेण्याची काय गरज होती? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अशातच आता तिने आपणाला हे लग्न करायचं नसल्याचं केतनला सांगितल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सियाचा विरोध असतानाही केतन लग्न करण्यावर ठाम असल्याने अखेर तिने हे भयानक कृत्य केल्याचं आता समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाने केतनचा खून हा रागाच्या भरात किंवा अचानक केला नाही. तर तिने पुर्ण प्लॅनिंग करून हा खून केला आहे.

Siya Goyal, accused in the Ketan Agrawal murder case
Union Cabinet Reshuffle : केंद्रात राघव चढ्ढा अन् शिवसेनेला मोठं बक्षिस मिळणार? अमित शहांनी राष्ट्रपतींची भेट घेताच ठरला मंत्रिमंडळातील फेरबदलाचा दिवस

चौकशी दरम्यान सियाने पोलिसांना सांगितलं की, "मी माझं आणि चेतनचं अफेअर असल्याचं केतनला स्पष्ट सांगितलं होतं. शिवाय मला हे लग्न करायचं नाही आणि पळून जायचं आहे, असंही सांगितलं होतं. पण केतन लग्न रद्द करायला तयार नव्हता.' उलट तो मला म्हणाला, 'आता हे लग्न मोडू शकत नाही, माझं कुटुंब खूप श्रीमंत आहे, तू कुठेही गेलीस तरी तुला शोधून काढू''

सियाच्या या दाव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. जर तिला लग्न करायचं नव्हतं तर तिच्यावर दबाव होता का? आणि हे सर्व सियाने साखरपुड्याच्या आधी केतनला का सांगितलं नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Siya Goyal, accused in the Ketan Agrawal murder case
Ketan Agarwal: सियाचे वडील ICUमध्ये; आई म्हणाली, ‘तिलाही लोहगडावरून ढकलून द्या’! चेतन चौधरीचा कर्मचारी बनणार माफीचा साक्षीदार?

शिवाय सियाच्या कुटुंबियांचा तिचं आणि चेतनचं नातं मान्य नव्हतं. केतन श्रीमंत असल्याने तिच्या घरचे लग्नासाठी सियावर दबाव आणत होते. शिवाय सिया आणि चेतनला अमली पदार्थांचे व मद्यपानाचे व्यसन होते. तिच्या याच सवयींमुळे तिच्या घरचे चिंतेत होते. त्यामुळे ते सियाचे लग्न घाईघाईत लावून देण्याच्या तयारीत होते, असंही सांगितलं जात आहे. मात्र, याच घाईमुळे एका मुलाचं आयुष्य उध्वस्त झालं असून याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com