Jain muni controversy Mumbai : मुंबईत पुन्हा जैनमुनी नीलेश चंद्र अन् शिवसेना-मनसे यांच्या वाद तापला आहे. जैनमुनी नीलेश चंद्र यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष केलं. 'कोंबडीच्या नादात शिवसेना गेली, तसं तुझं होईल', असे राज ठाकरेंचं नाव न घेता जैनमुनी नीलेश चंद्र यांनी सुनावलं.
यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे अखिल चित्रे यांनी मैदानात येत, तथाकथित जैनमुनींना पुढं करून, मुंबईचं जाती-जातीमधील वातावरण दूषित करण्याच राजकारण सुरू आहे. जर कुणी जैन धर्माचा वापर करून वाद पेटवीत असेल, तर वेळीच थांबवा. भाजपचं सूत्र स्पष्ट ‘use and throw’! या चिथावणीखोर ‘जैनमुनी’ मागचा खरा बोलविता धनी कोण, हे ओळखा आणि मुंबईची शांतता बिघडवू पाहणाऱ्या घटकांना रोखा, असं आवाहन केलं.
जैनमुनी नीलेश चंद्र यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबरच राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला आहे. त्यात ते म्हणतात, "कबुतरांचा पुढं काय झालं, आज आपला आमदार असता, खासदार असता, तुमचा एक पण नगरसेवक नाही. आज बिल्डिंगमध्ये एक जरी प्रॉब्लेम आला, मुर्गी के चक्कर मैं, संपूर्ण परेल मैं उद्धव ठाकरे का राज है इधर. लाओ किसो भी, बीजेपी को, किसी भी नेता को फोन लगाओ की, मेरे बिल्डिंग के अंदर लफडा हो गया है, कोई भी नही आऐगा. आमदार उसका, खासदार उसका, नगरसेवक उसका, थापड मार-मार के वोट दो, इस लालबाग मे रहना है तो, ये ध्यान रखना अभी तो मार रहे है, वापस पिटेंगे."
'मोदी ने कहा था 'बटेंगे तो कटेंगे', मैं इन लोगो को कहता हु तुम कटेंगे तो पिटोगे, इसी लिए पहिले सबसे जादा अपनी वोट बँक मजबूत करो. मोदीजी ने भारत को, विश्व को, हिंदू (Hindu) सनातन की रहा दिखाई. पण आज आपण महाराष्ट्रात भाषाओ के अंदर, हिंदू-मुस्लिम अन् बांगलादेश विवाद बाद में, अभी मराठी और मारवाडी, ऐसा विवाद शुरू हो गया, पुरे महाराष्ट्राभर में जाता हु मराठी लँग्वेज में बोलता हु, मैंने मराठी लोगो के दिमाग में से भ्रम निकाल दिया. राज ठाकरे के दिमाग मैंसे भी निकाल दिया. मुर्गी की चक्कर में शिवसेना गई, वैसे तू भी जायेगा,' असे जैनमुनी नीलेश चंद्र यांनी म्हटलं आहे.
जैनमुनी नीलेश चंद्र यांच्या या विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे अखिल चित्रे यांनी 'एक्स'वर पोस्ट लिहित, जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "पहिलं, महाराष्ट्रात प्रत्येकाला काय खायचं ते ठरवण्याचा अधिकार आहे. त्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आणि शिवसेनेने देरासरसमोर चिकन शिजवलं नव्हतं. मुनी असाल, तर खोटं बोलणं पाप आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं, "शिवसैनिक जैन मतदारांना मारहाण करतात" हा आरोप सरळसरळ खोटा आहे. आमचे खासदार, आमदार, नगरसेवक प्रत्येक मुंबईकराची सेवा करतात, धर्म-जात न पाहता," असं ठणकावून सांगितलं आहे.
'विलेपार्ल्यातला जैनालय नेमकं कुणामुळे वाचला? तो तोडला जात होता, तेव्हा कुणाचं सरकार होतं, याचाही जरा मागोवा घ्या. आमचं स्वप्न मुंबई शांत, सुरक्षित आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर राहावी, हेच आहे. पण भाजपला ते नको. मराठीविरुद्ध गुजराती, उत्तर भारतीय, हिंदी भाषिक, असे सर्व प्रयत्न फसल्यावर आता त्यांनी दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा नवा डाव टाकला आहे. यासाठीच एका तथाकथित जैनमुनीला पुढे करून मुंबईचं वातावरण गढूळ करण्याचं राजकारण सुरू आहे,' असा गंभीर आरोप अखिल चित्रे यांनी केला.
'हिंसाचाराला चिथावणी देणं हे जैन तत्त्वज्ञानात मुळीच बसत नाही. हिंदू-मुस्लिम तणाव वाढवणारी भाषा आणि लालबागमध्ये ‘हिंदू–बांगलादेश’ असा विषय उकरून काढण्याचा हेतू स्पष्ट आहे. इतकीच देशसेवा असेल, तर सीमा सुरक्षेबाबत अमित शहांनाच विचारणा करा. माझी जैन बांधवांना विनंती आपण मुंबईत शांततेनं राहतो. जर कुणी जैन धर्माचा वापर करून वाद पेटवीत असेल, तर वेळीच थांबवा. भाजपचं सूत्र स्पष्ट ‘use and throw’. आज वापरतील, उद्या वादाच्या तोंडाशी तुम्हालाच सोडून देतील. म्हणून या चिथावणीखोर ‘जैनमुनी’मागचा खरा बोलविता धनी कोण, हे ओळखा आणि मुंबईची शांतता बिघडवू पाहणाऱ्या घटकांना रोखा,' असं आवाहन अखिल चित्रे यांनी केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.