Maharashtra government news  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Government : यंदा दिवाळी जोरात! फडणवीस सरकारकडून ९ नोव्हेंबरला सुट्टी जाहीर; सलग चार दिवस सुट्टीचा योग

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरातील राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना ९ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Hrishikesh Nalagune

Maharashtra Government : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सलग चार दिवस सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.

शासन निर्णयानुसार, २०२६ या वर्षासाठी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांसाठी गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशी या सणांच्या निमित्ताने स्थानिक सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, गोपाळकाल्याची सुट्टी शनिवारी आल्याने ती रक्षाबंधनाच्या दिवशी देण्यात आली होती. त्यामुळे वर्षातील तिसरी शिल्लक स्थानिक सुट्टी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

त्यानुसार, सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी लागू असेल. या निर्णयामुळे दिवाळीच्या सणासाठी कर्मचाऱ्यांना सलग चार दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

मुंबईतील सरकारी कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्टी

दिवाळीच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल :

  • शनिवार, ७ नोव्हेंबर : साप्ताहिक सुट्टी

  • रविवार, ८ नोव्हेंबर : साप्ताहिक सुट्टी

  • सोमवार, ९ नोव्हेंबर : राज्य शासनाने जाहीर केलेली स्थानिक सुट्टी

  • मंगळवार, १० नोव्हेंबर : दिवाळी पाडवा, शासकीय सुट्टी

त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना शनिवारपासून बुधवारपर्यंत सलग पाच दिवस सुट्टी मिळणार आहे. दिवाळीच्या काळात गावी जाण्याचे किंवा कुटुंबासोबत सण साजरा करण्याचे नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT