Ritu Tawde News : भाजपच्या मुंबई महापौर रितू तावडे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या मनगटाव असलेल्या घड्याळाची किंमत तब्बल एक कोटी रुपये असल्याचा दावा नेटकरी करत आहेत. या घडाळ्याच्या किंमतीवर तावडे यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येत आहे.
सोशल मीडियातील दाव्यानुसार रितू तावडे यांनी परिधान केलेल्या ‘Rolex येलो गोल्ड डेटोना’ या ब्रँडच्या घड्याळाची किंमत एक कोटी आहे.
गजाभाऊ या ट्विटर हँडलवरून दावा करण्यात आला आहे की, घड्याळाची आवड असल्यामुळे महापौरच्या हाताकडे लक्ष गेले. एकदम महागडे Yellow gold Rolex Daytona light dial माझ्याकडून रिस्पेक्ट ... रिटेल किंमत 60-70 लाख ... भारतातली मार्केट किंमत 1 करोड पेक्षा जास्त.
दरम्यान, सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात असताना महापौर रितू तावडे यांनी सोशल मीडियावर या संदर्भात सत्य काय ते सांगत. सर्व दावे खोडून काढताना आपले घड्याळ एक कोटी रुपये किंमतीचे नसल्याचे सांगितले आहे .त्यांनी म्हटले आहे की, ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे.
'माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे.अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही.', असे देखील महापौर तावडे सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.