Mumbai Mayor Ritu Tawde announcing the city’s 100-day master plan, outlining seven priority initiatives aimed at improving governance, infrastructure, healthcare, and cleanliness across Mumbai. Sarkarnama
मुंबई

Ritu Tawde Mayor : मुंबईचा कायापालट होणार! महापौर रितू तावडे यांचा '100 दिवसांचा मास्टर प्लॅन' तयार; 7 कलमी कार्यक्रम जाहीर

Mumbai 100 days Development plan : मुंबईच्या विकासासाठी महापौर रितू तावडे यांनी 100 दिवसांचा 7 कलमी मास्टर प्लॅन जाहीर केला. स्वच्छता, आरोग्य, नालेसफाई, पारदर्शक प्रशासन आणि फेरीवाला पुनर्वसन यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांवर भर.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपला '100 दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा' जाहीर केला आहे. 11 फेब्रुवारीला पदभार स्वीकारल्यानंतर, अवघ्या एका महिन्यात महापौरांनी सात महत्त्वाच्या उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करून प्रशासनाला गती दिली आहे.

महापौर म्हणाल्या, मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन अधिक पारदर्शक आणि नागरिककेंद्रित करणे हे आमचे लक्ष्य आहे. या आराखड्यात 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम आणि 'लाडक्या बहिणीं' साठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासारख्या महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश आहे.

'भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि सुरक्षित मुंबई' हे आमचे ब्रीद आहे. तर मुंबईच्या पायाभूत सुविधा आणि जनसामान्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वासही महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी तावडे यांनी मुंबईच्या विकासासाठी '100 दिवसांचा 7 कलमी प्राधान्यक्रम आराखडा' जाहीर केला.

महत्त्वाचे 7 उपक्रम :

  1. पारदर्शक कारभार : पालिकेची सर्व खरेदी आता पोर्टलमार्फत होणार

  2. स्वच्छता मोहीम : समुदाय स्तरावर स्वच्छता स्पर्धा आणि कचरामुक्त वॉर्डाचे नियोजन

  3. नालेसफाई व ब्रिमस्टोवॅड 2 : पावसाळ्यापूर्वी 100 टक्के नालेसफाई आणि पाणी तुंबण्याच्या समस्येवर आयआयटी मुंबईच्या मदतीने उपाययोजना

4. फेरीवाला पुनर्वसन : पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोडसह ओळखपत्र आणि नियोजित हॉकिंग झोनची निर्मिती

5. आरोग्य सुविधा : पालिकेच्या रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यावर भर

6. प्रवेशद्वार उभारणी : मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान भव्य प्रवेशद्वार उभारणे

7.राणीची बाग : आशियाई सिंहांच्या जोडीसाठी गुजरात सरकारकडे यशस्वी पाठपुरावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT