Mumbai News: घाटकोपर मुंबईत की गुजरातमध्ये? महापालिकेची कागदपत्रे दिली जाताहेत गुजराती भाषेतून; हिंदू स्माशनभूमीत नेमकं काय घडलं?

Mumbai News: मुंबई महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली, ही निवडणूक प्रामुख्यानं मराठी भाषा आणि मराठी माणूस याच मुद्द्यावर लढली गेली. भाजपनंही आपली सत्ता आल्यास महापौर हा मराठी माणूसच असेल असं निवडणुकीपूर्वी जाहीर केलं होतं.
Ghatkopar Hindu Cremation_Raj Thackery
Ghatkopar Hindu Cremation_Raj Thackery
Published on
Updated on

Mumbai News: मुंबई महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली, ही निवडणूक प्रामुख्यानं मराठी भाषा आणि मराठी माणूस याच मुद्द्यावर लढली गेली. भाजपनंही आपली सत्ता आल्यास महापौर हा मराठी माणूसच असेल असं निवडणुकीपूर्वी जाहीर केलं होतं. त्यानुसार, रितू तावडे या मराठी महिला मुंबईच्या महापौर बनल्या. पण आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे घाटकोपरमध्ये गुजराती भाषेतून महापालिकेची कागदपत्रे दिली जात असल्याचं समोर आलं आहे.

Ghatkopar Hindu Cremation_Raj Thackery
Eknath Shinde : उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार ; एकनाथ शिंदेंच्या एका विधानाने भाजपमध्ये खळबळ

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार उघड केला आहे. घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे विभाग सचिव अॅड. अभिषेक सावंत यांनी यासंदर्भात बृहन्मुंबई महापालिका सहाय्यक आयुक्तांना यासदंर्भात पत्र लिहिलं आहे. तसंच घाटकोपरमध्ये गुजराती भाषेतून दिल्या जाणाऱ्या महापालिकेच्या पावत्या प्रत्यक्ष समोर आणल्या आहेत. पत्रात सावंत म्हणतात की, घाटकोपरच्या हिंदू स्माशानभूमीत पांढऱ्या रंगाची जी पावती मिळते ती गुजराती भाषेतून दिली जाते. ही संपूर्ण पावतीच गुजराती भाषेत छापण्यात आली आहे. ही पावती मराठी भाषेतूनच दिली जावी, अन्यथा मनसेकडून तीव्र स्वरुपाचं आंदोलन उभारलं जाईल. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनीच त्यांनी हा अर्ज महापालिकेकडं दिला आहे.

Ghatkopar Hindu Cremation_Raj Thackery
Dhananjay Munde: "परळीचे नाव उंचीवर ने"; युपीएससीत यशाचा झेंडा फडकवणाऱ्या हर्षवर्धन तिडकेला धनंजय मुंडेंच्या शुभेच्छा

दरम्यान, घाटकोपरच्या हिंदू स्माशनभुमीत दिली जाणारी मृत्यू दाखल्याची जी पावती समोर आली आहे, ती संपूर्णतः गुजराती भाषेत छापलेली आहे. त्यामध्ये केवळ मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आणि त्याची वैयक्तिक माहितीचा तपशील हाताने लिहावा लागतो. विशेष म्हणजे या पावतीवर महापालिकेचा लोगो किंवा नावही छापलेलं नाही. त्यामुळं या पावत्या खासगी संस्थेकडून दिल्या जाताहेत की महापालिकेच्या अधिकृत पावत्या आहेत? हा संभ्रम आहे. या गोंधळामुळं मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला असून तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

Ghatkopar Hindu Cremation_Raj Thackery
Medical student harassment allegation : राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता अडचणीत, गुन्हा दाखल; वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा

नियम काय?

महापालिकेच्यावतीनं दिल्या जाणाऱ्या जन्म-मृत्यूच्या पावत्या या कोणत्या भाषेत दिल्या जाव्यात याबाबत काही नियम आहेत. जन्म/मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ आणि महाराष्ट्र नियमांनुसार प्रमाणपत्राची मुख्य भाषा स्थानिक अधिकृत भाषा (मराठी) आणि इंग्रजी असते. त्यानुसार, मुंबईमहानगरपालिका क्षेत्रात दिले जाणारे जन्म-मृत्यू दाखले हे प्रामुख्यानं मराठी आणि इंग्रजी भाषेत दिले जातात. BMCच्या अधिकृत पोर्टलवर अर्ज प्रक्रिया ही इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रमाणपत्रे देखील या दोन्ही भाषांमध्ये दिली जातात. पण ही जन्म-मृत्यूची प्रमाणपत्रे थेट हिंदी, गुजराती, तमिळ आदी भाषांमध्ये दिली जात नाहीत. जर तुम्हाला या कोणत्याही भाषांमध्ये प्रमाणपत्र पाहिजे असेल तर प्रमाणपत्र इंग्रजी-मराठी भाषेत मिळवल्यानंतर त्याचा प्रमाणित अनुवाद अर्थात सर्टिफाईड ट्रान्सलेशन करुन घ्यावं लागतं. याचा अर्थ कायदेशीर नोटरीद्वारे हे प्रमाणपत्र हव्या असलेल्या भाषेत तयार केल्यास ते ग्राह्य धरलं जातं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com