Mumbai Metro Slab Accident: मुलुंड इथं मेट्रोच्या कामाचा स्लॅब कोसळून त्यात एक रिक्षा चक्काचूर झाली असून त्यात चालकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेचं विश्लेषण मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी नुकतंच माध्यमांसमोर केलं होतं. त्यांच्या या विश्लेषणाचं शऱद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून कौतुक करण्यात आलं आहे. पण या अपघाताप्रकरणी काही सवालही राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आले आहेत. तसंच जनतेच्या मनातील या प्रश्नांचा तातडीनं खुलासा करावा असं आवाहनही केलं आहे.
मुलुंडच्या मेट्रो स्लॅब दुर्घटनेप्रकरणावर बोलताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, "मी आता प्रत्यक्ष अपघातस्थळी असून प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आणि दुर्घटनेचे व्हिडिओ पाहिल्या नंतर हा प्रकार निष्काळजीपणामुळं घडला आहे. कालच हा पॅराफिट वॉल बसवली होती आणि आज ती खालच्या वाहनावर पडली आणि त्यात एकाचा मृत्यू झाला हा खूपच मोठा निष्काळजीपणा असल्यानं त्याला जबाबदार असलेल्यांवर शंभर टक्के कारवाई होणार.
कॉन्ट्रॅक्टरचा तर निष्काळजीपणा यातूनच दिसतोच आहे पण साईट इंजिनिअर्सनं याकडं देखरेख ठेवली होती का? त्याचं याकडं लक्ष होतं का? हे सगळे प्रश्न यानिमित्त उपस्थित झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींना उपासना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून यात रिक्षातील एका पॅसेंजरचा मृत्यू झाला असून इतर तीन जणांवर उपचार सुरु आहेत. मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला चांगलं करायचं आहे. मुंबईकरांना सर्व सोयी-सुविधा द्यायच्या आहेत. पण त्याचबरोबर मुंबईकरांची सुरक्षितता हा फार महत्वाचा विषय आहे. यासाठी सर्वांनी सर्व प्रकारच्या एसओपीज फॉलो केल्या पाहिजेत"
या दुर्घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं की, मुंबईच्या महापौर माननीय रितू तावडे यांनी मान्य केलंय की, मुलुंड मेट्रो दुर्घटना ही निष्काळजीपणामुळे घडली. महापौर महोदयांनी संवेदनशीलपणे केलेले हे प्राथमिक विश्लेषण नक्कीच स्वागतार्ह आहे. पण, महापौर महोदयांनी आणि महायुती सरकारने मुंबईकरांना पडलेल्या 'या' प्रश्नांचाही तातडीने खुलासा करायला हवा.
१. हा निष्काळजीपणा नेमका कुणाचा? ठेकेदार कंपनीचा? की MMRDA प्रशासनाचा? ठेकेदार असेल तर त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकणार का?
२. या दुर्घटनेची सखोल चौकशी कोणत्या स्तरावर होणार? ठराविक कालमर्यादेत ही चौकशी पूर्ण होणार का?
३. या दुर्घटनेची कारणे तुम्ही कधीपर्यंत शोधून काढणार? की चौकशीचं तुमचं आश्वासन हे आम्ही फक्त हवेतील गोळीबार समजायचा?
४. या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना तुम्ही ५ लाखांची आर्थिक मदत दिली. माणसाच्या जीवाची किंमत इतकी स्वस्त आहे का? मृतांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीत तुम्ही सामावून घेणार का?
५. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरु आहेत. त्या ठिकाणाहून जाताना मुंबईकरांच्या मनात भीती आहे. त्यांना सुरक्षिततेची हमी तुम्ही देणार का?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.