

Akhilesh Yadav: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आजच्या व्हॅलेंटाईन डे निमित्त महत्वाचं भाष्य केलं आहे. आपला व्हॅलेंटाईन कोण आहे? हे त्यांनी सांगितलं असून त्यांचं उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल आणि हसूही येईल. पण अखिलेश यादव यांनी नेमकं काय म्हटलंय? जाणून घेऊयात.
अखिलेश यादव यांनी शुक्रवारी पक्षाच्या एका कार्यक्रमानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार? हा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना युपीचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, "आमचा पक्ष एकजूट होऊन सातत्यानं लोकांना जोडून घेत आहे. व्हॅलेंटाईन डे तर तुम्ही साजरा करु शकता पण पॉलिटिकल लोक साजरा करु शकत नाही. आमच्यासाठी तर हा राजकीय प्रेमाचा सण असेल, जे येतील आमच्यासोबत त्यांच्यासोबत आम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करु. दरम्यान, आज शनिवारी एका कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर गर्दीतून मार्ग काढत आपल्या कारपर्यंत जात असलेल्या अखिलेश यादव यांना एका पत्रकारानं विचारलं की, अखिलेशजी आज आपला व्हॅलेंटाईन कोण आहे? यावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव त्या पत्रकाराला उत्तर दिलं 'तुम'...! म्हणजेच तू माझा व्हॅलेंटाईन आहे, माझा व्हॅलेंटाईन 'आज तक' चॅनेल आहे"
दरम्यान, अखिलेश यादव यांच्या या विधानामुळं एकच हशा पिकला पण त्यांनी एकप्रकारे अशा पद्धतीचा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराची चांगलाच समाचार घेतला. अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव हे दोघेही खासदार आहेत. हे पती-पत्नी त्यांची मुलं आणि कुटुंबिय हेच एकमेकांचे व्हॅलेंटाईन आहेत. पण पत्रकारानं अशा पद्धतीनं प्रश्न विचारल्यानं त्याला अखिलेश यादव यांनी तात्काळ मजा घेणारं उत्तर दिलं. "तूच माझा व्हॅलेंटाईन आहेस," असं उत्तर त्यांनी दिलं. पुढे ते असंही म्हणाले की, "'आज तक' हा चॅनेलच माझा व्हॅलेंटाईन आहे"
आज १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे जगभरात उत्साहात साजरा केला जात आहे. व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेम दिवस हा तरुणाईसाठी खास दिवस असतो. केवळ तरुणच नव्हे तर सर्वच वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला जी कोणी व्यक्ती प्रिय असेल ती त्याच्यासाठी व्हॅलेंटाईन असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळं कुठल्याही नात्यातील प्रेम भावना ही व्हॅलेंटाईन असल्याचं म्हटलं जातं. व्हॅलेंटाईन डे निमित्त संपूर्ण आठवडाभर (७-१४ फेब्रुवारी) विविध प्रकारचे डे साजरे केले जातात. यामध्ये रोझ डे, प्रपोझ डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे असे विविध डेज साजरे केले जातात. त्यानंतर शेवटी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा होतो आणि याची सांगता होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.