Mira Road Lone Wolf Attack : मुंबईतील मीरा रोडवरील दोघा सुरक्षांवरील चाकू हल्ला करणारा, जैब जुबैर अन्सारी याने lone wolf attack पद्धतीने हल्ला केला. या हल्ल्यामुळे मुंबई हादरली असून सुरक्षा यंत्रणेला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
जैब अन्सारी याने दोघा सुरक्षा रक्षकांवर हल्ला करण्यापूर्वी त्यांना कलमा वाचण्यास सांगितला होता, असा दावा एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. यामुळे अधिकच खळबळ उडाली आहे.
हल्लेखोर जैब जुबैर अन्सारी याने सुरक्षा रक्षकांकडे गेल्यानंतर त्यांना सुरवातीला मशिदीचा रस्ता विचारला. थोड्या वेळाने परत आल्यावर त्याने एका सुरक्षा रक्षकाला त्याचा धर्म विचारला आणि अचानक चाकूने हल्ला केला.
यानंतर जैब जुबैर अन्सारी हा सुरक्षा (Security) रक्षकांच्या केबिनमध्ये गेला, तिथे त्याने दुसऱ्या सुरक्षा रक्षकाला 'कलमा' वाचण्यास सांगितले. जेव्हा रक्षक ते वाचू शकला नाही, तेव्हा त्याने त्याच्यावरही हल्ला केला. याच तो सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला आहे.
राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो रमेश सेन, असे जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकांचे नाव आहेत. राजकुमार मिश्रा गंभीर जखमी असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जखमी सुरक्षा रक्षकांची भेट घेतली.
ठाणे पोलिसांनी जैब जुबैर अन्सारी याला सीसीटीव्ही माग काढत अटक केली. पोलिसांना जैब जुबैर अन्सारीबाबत अधिक शंका आल्याने, वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू झाल्यावर प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. न्यायालयाने त्याला चार मे रोजीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
'ATS'ने त्याला ताब्यात घेतल्यावर, त्याच्या मीरा रोडवरील घरातून, लॅपटाॅप, पेन-ड्राईव्ह जप्त केला आहे. याशिवाय घराची झडतीत मोबाइल, इंटरनेट हिस्ट्री आणि संपर्काची माहिती तपासली आहे. यात धक्कादायक माहिती समोर आली असून, नोटमध्ये “ISIS”, “लोन वुल्फ”, “जिहाद” आणि “गाझा” यासारखे शब्द आढळले आहेत.
'ATS'ने या नोटची आणि आरोपीच्या डिजिटल फुटप्रिंट्सची कसून चौकशी करत आहे. हा हल्ला पूर्व-नियोजित होता की अचानक झालेला वाद, हे तपासानंतरच स्पष्ट होईल. पण संजय निरुमप यांनी केलेल्या 'कलमा' वाचण्याच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.