Lone wolf attack India : दहशतवादी हल्ल्याचा नवीन पॅटर्न; मुंबईतील 'lone wolf attack'ने महाराष्ट्र हादरला, दोन सुरक्षा रक्षक जखमी, हल्लेखोर कोठडीत

Thane ATS arrests Jaib Zubair Ansari for carrying out a lone wolf-style attack on two security guards in Mira Road Naya Nagar area to spread terror : मुंबईजवळील मीरा रोडवरील सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्लाखोराला ताब्यात घेत, दहशतवाद विरोधी पथकाकडून तपास होत आहे.
Thane Crime Update
Thane Crime UpdateSarkarnama
Published on
Updated on

Mira Road attack news : मुंबईजवळील मीरा रोड परिसरात सोमवारी पहाटे घडलेल्या चाकूबाजीची घटना म्हणजे, lone wolf attack असल्याचे सांगितले जाते. हा एक दहशतवादी हल्ल्याचा प्रकार असून, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

एका इमारतीत तैनात असलेले सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो रमेश सेन यांच्यावर जैब जुबेर अन्सारी याने चाकूने हा हल्ला केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून जैब जुबैर अन्सारी (वय 31) याला अवघ्या दीड तासांत अटक केली आहे.

हल्लेखोर जैब जुबैर अन्सारी याने सुरवातीला सुरक्षा रक्षकाला नाव आणि त्याचा धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांच्यावर चाकूने वार केले. ठाणे दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) हल्लेखोराला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे तपास सुरू केला आहे. न्यायालयाने त्याला चार मे रोजीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हल्लेखोर जैब जुबैर अन्सारी हा कोणत्या कट्टरवाद्यांशी संबंधित आहे, याचा तपास केला जात आहे.

ही घटना 27 एप्रिलला पहाटे सुमारे 4 वाजता नया नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत, वॉकहार्ट हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या अस्मिता ग्रँड मेंशनच्या साइटवर घडली. त्या ठिकाणी राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन हे सुरक्षा रक्षक म्हणून ड्युटीवर तैनात होते. पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, 31 वर्षीय आरोपी जैब जुबैर अंसारी घटनास्थळी आला आणि दोन्ही गार्ड्सशी बोलताना अचानक चाकू काढून हल्ला केला. या हल्ल्यात राजकुमार मिश्रा गंभीर जखमी झाले, तर सुब्रतो सेन यांना किरकोळ दुखापत झाले आहेत.

Thane Crime Update
Govind Pansare controversy : गोविंद पानसरेंविरोधात मरणोत्तर FIRची मागणी; आमदार गायकवाडांच्या पावलाने नवा राजकीय वाद पेटला!

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीची ओळख पटवली. अवघ्या दीड तासांत त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरू आहे.

Thane Crime Update
Govind Mokate Bypoll History : गोविंद मोकाटेंचा पोटनिवडणुकीतील विजयाचा 'ट्रॅक रेकॉर्ड भारी'; 'राहुरी'च्या निकालाची वाढली धडधड!

हल्लेखोर दहशतवादी संघटनेशी निगडीत असल्याचे बोलले जात आहे. पण पोलिसांकडून या चर्चांचं खंडण करण्यात आलं आहे. या हल्ल्यामागे कोणते मोठे षड्यंत्र किंवा संघटित साखळी आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. भारतीय न्याय संहितेच्या कलम 196 (1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विविध समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याशी संबंधितीचे कलम आहे.

या प्रकरणाला सांप्रदायिक वळण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पोलिसांनी सध्या कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे आणि घाईचे ठरेल, असे म्हटलं. तपास यंत्रणा आरोपीच्या पार्श्वभूमीचाही सखोल तपास करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, तो गेल्या काही वर्षांपासून मीरा रोड परिसरात राहत होता आणि त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचाही तपास केला जात आहे. उशिरा रात्री फॉरेन्सिक पथकाने त्याच्या घरी जाऊन पुरावे गोळा केले. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com