Mumbai Municipal Corporation  Sarkarnama
मुंबई

BMC मध्ये 'GEN Z'चा आवाज घुमणार; 30 वर्षांखालील 12 नगरसेवक

Gen Z Councillors in Mumbai Mahapalika: मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये युवा नेते (GEN Z) नगरसेवक झाले आहेत. एकट्या मुंबईकरांनी 12 GEN Z नगरसेवकांना निवडून दिले असून त्यांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे.

सरकारनामा ब्यूरो

BMC Election Results 2026: महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी राज्यातील राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. या निकालांमध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे की कमी वयाच्या विजयी उमेदवारांची. राज्यात बहुतांश ठिकाणी तरुणाईने विजयाचा गुलाल उधळला आहे.

मुंबई महापालिकेत अशा उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. पारंपारिक प्रचारासह या जेन झी उमेदवारांनी सोशल मीडियावर नव्या तंत्रज्ञानाचा वापर करीत युवा मतदारापर्यंत पोहचण्यात ते यशस्वी ठरले आहेत. हे जेन झी महापालिकांना नवा राजकीय लूक देणार का? याविषयी नागरिकांमध्ये कुतूहल आहे.

नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत अनेक पक्षांना दिग्गज माजी नगरसेवक, नेत्यांचे तिकीट कापत युवा उमेदवारांना रिंगणात उतरवले होते. मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये युवा नेते (GEN Z) नगरसेवक झाले आहेत. एकट्या मुंबईकरांनी 12 GEN Z नगरसेवकांना निवडून दिले असून त्यांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे.

महापालिकांमध्ये 'जेन झेड' नगरसेवकांची दमदार एन्ट्रीने झाली असली तरी ते कशाप्रकारे प्रशासकीय कामे कशी करणार, डिजिटल युगात वाढलेली ही पिढी महापालिका क्षेत्रातील नागरीकांच्या समस्या कशा सोडवणार, हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. जेन झी (Gen Z) मधील हे तरुण नेते नवे व्हिजन घेऊन शहराच्या विकास करीत अशी अपेक्षा आहे.

पुण्यात प्रभाग 7 मधून अवघ्या 24 वर्षांच्या अंजली ओरसे यांनी मिळवलेला विजय विशेष लक्षवेधी ठरला आहे. गोखले नगर परिसरातून निवडणूक लढवलेल्या अंजली ओरसे या सुरुवातीपासूनच चर्चेत होत्या. आर्ची सारखी दिसणारी उमेदवार म्हणून सोशल मीडियावर त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती.

BMCमध्ये Gen Zची एन्ट्री

  1. ऋतेश राय – वय 29, शिंदेसेना, वॉर्ड क्रमांक 86 (अंधेरी पूर्व)

  2. अपेक्षा खांडेकर – वय 29, शिंदेसेना, वॉर्ड क्रमांक 142 (मानखुर्द)

  3. हैदर अली शेख – वय 28, काँग्रेस, वॉर्ड क्रमांक 34 (मालाड पश्चिम)

  4. आयेशा खान – वय 28, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), वॉर्ड क्रमांक 96 (वांद्रे पूर्व)

  5. अदिती खुरसुंगे – वय 29, शिंदेसेना, वॉर्ड क्रमांक 11 (बोरिवली पूर्व)

  6. कशिश फुलवरीया – वय 22, भाजप, वॉर्ड क्रमांक 151 (चेंबूर / कुर्ला पूर्व)

  7. अंकित प्रभू – वय 29, ठाकरेसेना, वॉर्ड क्रमांक 54 (गोरेगाव पूर्व)

  8. राजुल पाटील – वय 29, ठाकरेसेना, वॉर्ड क्रमांक 114 (भांडुप पश्चिम)

  9. निर्मिती कणाडे – वय 25, शिंदेसेना, वॉर्ड क्रमांक 133 (घाटकोपर पूर्व)

  10. समान आजमी – वय 29, काँग्रेस, वॉर्ड क्रमांक 167 (कुर्ला पश्चिम)

  11. दक्षता कवटणकर – वय 28, भाजप, वॉर्ड क्रमांक 19 (कांदिवली पश्चिम)

  12. दिशा यादव – वय 29, भाजप, वॉर्ड क्रमांक 80 (अंधेरी पूर्व)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT