Mumbai Municipal Corporation Election News
Mumbai Municipal Corporation Election News sarkarnama
मुंबई

अखेर मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजलं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या (mumbai municipal corporation) निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड पुर्नरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. येत्या मार्च महिन्यात निवडणुक होण्याची शक्यता आहे. (Mumbai Municipal Corporation Election News)

मुंबईत (mumbai) ९ वार्ड वाढविण्यात आले आहेत. आता वॉर्डची संख्या २२७ वरुन २३६ झाली आहे. कोरोनामुळे आता कोणत्याही निवडणुका थांबणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. कोरोना महामारीमुळं अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. मात्र, मुंबई महापालिकेची निवडणूक ठरल्या वेळेतच होण्याची चिन्हं आहेत. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपत आहे. त्यामुळं त्यावेळीच निवडणूक होणं अपेक्षित आहेत.

२०११ च्या लोकसंख्येच्या आधारापेक्षा गेल्या ११ वर्षांच्या काळात वाढलेल्या नव्या इमारती, वस्त्या, आणि वाढीव नवी बांधकामे झालेल्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या घनतेचा आधार घेऊन वॉर्ड पुर्नरचना करण्यात आली आहे. मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगर याठिकाणी समसमान ३ वॉर्ड वाढवल्याचे सूत्रांनी सांगितले. (Mumbai Municipal Corporation Election News)

शहरभागात लोअर परळ, वरळी सारख्या नवी बांधकामे आणि इमारती उभ्या राहिलेल्या परिसरात नवे वॉर्ड येण्याची शक्यता आहे. पूर्व उपनगरांत मानखुर्द, संघर्षनगर, माहूल याठिकाणी नवे वॉर्ड येण्याची शक्यता आहे. पश्चिम उपनगरात बोरिवली, मालाड, वांद्रे भागात वॉर्ड वाढवले जाण्याची शक्यता आहे.

मुंबईसह राज्यातील इतर 14 महापालिकांच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका (Jilha Parishad Election) मार्च महिन्यात घेण्याचा निवडणूक आयोगाचा मानस असल्याची चर्चा आहे.

निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मतदान केंद्रावर काय काळजी घ्यावी याबाबत सूचना जारी केल्या आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यासंदर्भात काय उपाययोजना करणे आवश्यक आहे? अगदी एखादा मतदार विनामास्क आला तरी ती परिस्थिती कशी हाताळावी यासंदर्भात माहिती यात देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT