Why I Killed Gandhi: शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

कलावंत म्हणून त्यांनी भूमिका केली असेल तर ते गांधी विरोधी आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही.
Why I Killed Gandhi News
Why I Killed Gandhi Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिरुर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॅा. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. यावरुन सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. अमोल कोल्हेंवर काही जणांची टीका केली आहे, तर काहींनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Sharad Pawar React on Amol Kolhe)

शरद पवार म्हणाले, ''अमोल कोल्हे यांच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पाहिले पाहिजे. रामराज्य सिनेमा असेल यामध्ये रावणाची भूमिका करणारी व्यक्ती ही रावण असू शकत नाही. सीतेचं त्याने अपहरण केलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केलं असं होतं नाही,''

"'अमोल कोल्हे आमच्या पक्षात नवीन आहेत. कलावंत म्हणून त्यांनी भूमिका केली असेल तर ते गांधी विरोधी आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. नथुरामचे महत्व वाढवायचा कोणताही प्रयत्न नाही. कलावंत म्हणून मी कोणत्याही कलावंताचा सन्मान करतो,''(Why I Killed Gandhi News)

Why I Killed Gandhi News
अमोल कोल्हेंवर जितेंद्र आव्हाड संतप्त ; नथुरामाची भूमिका स्वीकारणं हे चुकीचं

भाजपने अमोल कोल्हे यांच्या भूमिकेला विरोध केला आहे, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला शरद पवारांनी उत्तर दिले. ''भाजप कधीपासून महात्मा गांधींजींची बाजू घेऊ लागला,'' असे म्हणत पवारांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टोला लगावला. ''भाजप हे गांधीवादी कधीपासून झाले? भाजपच्या संघ आणि त्यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. एक काळ असा होता की गांधींबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या कुठे आहेत बघितलं पाहिजे, त्यावर त्यांनी बोलावं,'' असा टोला त्यांनी लगावला. (Why I Killed Gandhi News)

Why I Killed Gandhi News
धक्कादायक : मोदी म्हणाले, बेटी बचाव, बेटी पटाव,’ नेटकऱ्यांचा हल्लाबोल

''छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो. त्यात तो मुघलांचा समर्थक होत नाही, किंवा राम -रावणाच्या भूमिकेत रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं असं होत नाही,'' असं पवार म्हणाले.

अमोल कोल्हे यांनी WHY I KILLED GANDHI या सिनेमामध्ये नथूराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्याच पक्षातल्या नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचा विरोध केला आहे. 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. या भूमिकेवरून राष्ट्रवादीमध्ये दोन मतप्रवाह दिसत आहेत.

Why I Killed Gandhi News
गोव्याच्या प्रचारात आदित्य ठाकरे; शिवसेनेच्या नऊ उमेदवारांची घोषणा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ''डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही,''

नथुरामाचे उदात्तीकरण करणाऱ्याच्या मी निषेध व्यक्त करतो. कलाकार आणि माणूस दोन वेगळ्या भूमिका नाहीत. पण जेव्हा गांधी साकारता तेव्हा तुमची भूमिका बदलत नाही. कलाकार आणि माणूस म्हणून दोन भूमिका असू शकत नाहीत. माहित नसलेली भूमिका करणं वेगळं असते, म्हणजे गब्बरसिंग हा माहित नव्हता, गब्बरसिंग कल्पनेने निर्माण केलेले पात्र आहे. पण जेल्हा तुम्हा महात्मा गांधी, नथूराम गोडसे साकारतात तेव्हा हे व्यक्तीमत्व सर्वांना माहित आहे. जेव्हा तुम्ही नथुरामाची भूमिका साकारतात, तेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये नथुराम आणतात, तुम्ही गांधींवरती गोळ्या झाडणार ना. तेव्हा तु्म्हाला काहीच वाटणार नाही का,'' असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com