Yashwant Jadhav,Kirit Somaiya sarkarnama
मुंबई

दोन वर्षात यशवंत जाधवांकडे ३६ मालमत्ता, तर त्यांच्या नेत्यांकडे किती संपत्ती असणार?

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी नेमक्या किती इमारती विकत घेतल्या याचा आकडा समोर आणला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत (Yashwant Jadhav)यांनी २४ महिन्यात मुंबईत ३६ बिल्डिंग विकत घेतल्या. त्यांच्याकडे इतकी संपत्ती तर त्यांच्या नेत्यांकडे किती संपत्ती असणार असा प्रश्न भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत सुमारे 36 मालमत्तांची खरेदी केलेली आहे. (Yashwant Jadhav properties)गेल्या दोन वर्षांत हे सर्व आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी नेमक्या किती इमारती विकत घेतल्या याचा आकडा समोर आणला आहे. या माहितीनुसार, यशवंत जाधव आणि यामिनी जाधव या दाम्पत्याने दोन वर्षांच्या कालावधीत मुंबईतील ३६ इमारती विकत घेतल्या.

यामध्ये प्रामुख्याने पगडी चाळी आणि जुन्या इमारतींचा समावेश आहे. यशवंत जाधव यांच्याकडे इतकी संपत्ती असेल तर त्यांच्या नेत्यांकडे किती संपत्ती असेल, असा सवालही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. ते माध्यमांशी बोलत होते.

सक्तवसुली संचलनालय, आयकर विभाग आणि कंपनी विभागाकडून या सगळ्याची चौकशी केली जाईल. यामध्ये तब्बल १००० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा दावाही सोमय्यांनी केला.

यशवंत जाधव यांच्या भायखळा येथील घरावर काही दिवसांपूर्वीच प्राप्तीकर विभागाने छापा टाकला होता. आयकर खात्याचे अधिकारी तब्बल ७० तास यशवंत जाधव यांच्या घरी ठाण मांडून बसले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी अनेक कागदपत्रांची तपासणी केली होती. त्यामुळे आता या प्रकरणात यशवंत जाधव यांच्यावर कोणती कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT