मुख्यमंत्री आज खासदारांना देणार कानमंत्र ; शिवसेना सामान्य जनतेपर्यत पोहचणार

पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकुण १९ जिल्ह्यात सुरू होणार आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचवण्यासाठी, शिवसेनेनं "शिव संपर्क अभियान" सुरू केलं आहे.

शिवसेनेच्या या शिव संपर्क (Shiv Sampark Abhiyan)अभियानात सहभागी असणाऱ्या खासदारांना आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (रविवारी) दुपारी १२ वाजता व्हिडियो कॅान्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

Uddhav Thackeray
नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली ; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष

यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, विनायक राऊत तसेच मुंबईतील इतर खासदार शिवसेना भवनात उपस्थित राहणार आहेत. शिव संपर्क अभियानाचा पहिला टप्पा २२ ते २५ मार्च दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकुण १९ जिल्ह्यात सुरू होणार आहे. या १९ जिल्ह्यात शिवसेनेचे १९ खासदार शिव संपर्क अभियान सुरू करणार आहेत.

Uddhav Thackeray
शिवसेनेनं खरंच, करुन दाखवलं, ISISचा प्रस्ताव बाकी आहे ; राणेंकडून टीकेचे बाण

पहिल्या टप्यातील १९ जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार आणि त्यांच्या सोबत शिवसेना पदाधिकाऱ्यांची १२ जणांची टीम कार्यरत असणार आहे. शिव संपर्क अभियानाच्या मार्फत शिवसेना सर्व सामान्य नागरिकांपर्यंत राज्यात शिवसेना करत असलेल्या विकास कामांची माहिती पोहचवणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com