Bala Nandgaonkar Sarkarnama
मुंबई

Mumbai Voter List Controversy : 11 लाख दुबार, बालेकिल्ल्यांची फोडाफोडी; 'मनसे' निवडणूक आयोगाला शिंगावर घेण्याच्या तयारीत!

Mumbai Elections 2025 Controversy: मुंबई महापालिकेतील मतदार याद्यांतील दुबार नावांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.

Pradeep Pendhare

MNS Protest Election Commission: मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच देशभर तिची चर्चा आहे. प्रशासन निवडणुकीची तयारी करत असून, प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढत असतानाच, मतदार यादीबरोबर प्रभागांच्या फोडाफोडीवरून, बाळा नांदगावकर चांगलेच आक्रमक झाले आहे. मतदार यादी पूर्णपणे सदोष झाल्यानंतरच निवडणूक घ्यावी, अन्यथा मनसे निवडणूक आयोगाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई (Mumbai) महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार नावे असल्याचे सांगत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. अनेक मतदारांची नावे तीन ते चार ठिकाणी नोंदवली गेली असून, मतदार यादीच्या पारदर्शकतेवर गंभीर शंका येते.

बाळा नांदगावकर म्हणाले, "‘सत्याचा विराट मोर्चा’ काढून मतदार यंत्रणेमधील त्रुटी जनतेसमोर आणल्या होत्या. त्या वेळी सत्ताधारी पक्षातील अनेकांनी मनसेच्या (MNS) आरोपांकडे दुर्लक्ष केले; परंतु आता खुद्द निवडणूक आयोगाने दुबार मतदारांची नावे असल्याचे मान्य केल्याने आपला दावा बळकट ठरत आहे." मुंबईत दुबार मतदारांची समस्या आम्हीच सर्वप्रथम मांडली. आता खुद्द निवडणूक आयोगही हे स्पष्ट नाकारत नाही. निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या आकडेवारीने आमचे दावे सत्य ठरले आहेत, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

उपनगरांमध्ये दुबार मतदार वाढले

आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार दुबार नोंदींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात उपनगरांमध्ये आढळले आहे, पश्चिम उपनगर 4 लाख 98 हजार, पूर्व उपनगर 3 लाख 29 हजार आणि दक्षिण मुंबई 2 लाख 73 हजार दुबार मतदार आहेत.

या आकडेवारीवरून मुंबईतील जवळपास प्रत्येक विभागात मतदार याद्यांमध्ये मोठ्या चुका झाल्या आहे. दुबार मतदारांची एवढी प्रचंड संख्या असताना, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना याची माहिती नसणे अशक्य आहे, असे सांगून, दुबार नावे वगळूनच मुंबई महापालिका निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मनसेची ठाम मागणी असल्याचे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

शिवसेना अन् मनसेचे बालेकिल्ले फोडले!

काही प्रभागांची फेररचना करण्यात आली आहे. मात्र यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि मनसेचे बालेकिल्ले मुद्दामहून फोडण्यात आले आहे, असाही दावा बाळा नांदगावकर यांनी केला. याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेऊन आवश्यक ते बदल करावेत, अशी मागणीही नांदगावकर यांनी केली.

हरकतींसाठी मुदत वाढवा

राज्यातील बऱ्याच महापालिकांमध्ये प्रारूप मतदार याद्यांवर हरकत व सूचना घेण्यासाठी मुदत वाढविण्याची आवश्यकता असून, अवघी सात दिवसांची मुदत अत्यंत कमी आहे. ती 15 दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार व विधान परिषद गटनेते सतेज पाटील ऊर्फ बंटी यांनी राज्य निवडणूक आयोगाला एक संयुक्त पत्र पाठवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT