Mumbai Phase 5 Elections: महाराष्ट्रात आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी (Lok Sabha Phase 5 Voting) मतदान पार पडत आहे. मात्र या मतदान प्रक्रियेत निवडणूक आयोगाकडून (Election Commission) मुद्दाम पक्षपातीपणा करत मतदान केंद्रावर दिरंगाई केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. याच पार्श्वभुमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक अधिकाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. शिवाय या निवडणूक अधिकाऱ्यांची नावे लिहून ठेवा पुढे आपण कोर्टात गेलो तर त्याचा फायदा होईल, असं म्हणत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना इशाराच दिला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत. परंतु मतदार आत मतदान करायला गेल्यानंतर त्यांना मत करण्यासाठी खूप वेळ लागत आहे. शिवाय ज्या भागात आम्हाला मोठ्या प्रमाणात मत मिळतात त्याच भागात मुद्दाम दिरंगाई केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच मोदी सरकार आयोगाचा वापर घरगड्यासारखा करुन घेत आहे. त्यामुळे मतदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आता थोडा वेळ राहिला असला तरी मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय कोणीही माघारी जाऊ नका.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच मतदान केंद्रावर आलेल्या लोकांनी मतदान केल्याशिवाय मतदानाची (Voting) प्रक्रिया बंद करता येत नाही. त्यामुळे कितीही वाजले पहाटे 5 वाजले तरी मतदान केंद्रातून बाहेर पडू नका. शिवाय पराभवाच्या भितीने मोदींना पछाडलंय आमच्या मतदानाचा टक्का जिथं जास्त आहे तिथं मुद्दाम उशीर केला जातोय. मात्र, मतदान केंद्रावर तुम्हाला मुद्दाम उशीर केला जात आहे, असं वाटताच त्याची माहिती जवळच्या शिवसेना (Shivsena) शाखेत द्या, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.
ज्याप्रमाणे मतदारांचं ओळख कार्ड पाहिलं जातं, त्याप्रमाणे केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांचं आयडी बघा त्याचं नाव लिहून घ्या नंतर प्रेस घेऊन मी त्यांची नावे उघड करेन. तसेच कोर्टात दाद मागायला गेल्यावर या नावांचा उपयोग होईल. तर मतदान कमी व्हावं म्हणून मोदी सरकारचा हा डाव आहे. परंतु, तुम्हा त्या डावाला बळी न पडता मतदान करा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.