Arun Gawli Sarkarnama
मुंबई

Arun Gawli : 'डॅडी'च्यासंदर्भातील कागदपत्रे गहाळ, गुन्हे शाखेची न्यायालयात माहिती; नेमकं प्रकरण काय?

Akshay Sabale

Mumbai News : खंडणी प्रकरणातील आरोप अरूण गवळी संदर्भातील काही कागदपत्रे गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गवळी याच्यावर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम अॅक्ट (मोक्का) लागू करण्यासंदर्भात कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती शुक्रवारी क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी मोक्का न्यायालयात दिली.

शिवसेना नेते आणि नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरूण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सध्या गवळी सध्या जामिनावर बाहेर आहे.

कथित खंडणी, आर्थिक लाभ आणि 2005 मध्ये मुंबई, ठाणे आणि कल्याणधील मालमत्ता हडप करण्यासाठी काहींना धमक्या दिला आरोप अरूण गवळी (Arun Gawli) आणि त्यांच्या टोळीतील काही जणांवर आहे.

नेमकं घडलं काय?

खंडणी प्रकरणात उलटतपासणीसाठी गवळीच्या वकिलांना कागपदत्रांची मागणी केली होती. पण, विशेष सरकारी वकिलांनी 2013 मध्ये मुंबईत पूर आला असताना ठेवलेली कागदपत्रे सापडत नसल्याचं न्यायालयात म्हटलं.

न्यायालयानं गेल्याच महिन्यात पोलिसांना (Police) कागदपत्रांवरून खडसावलं होतं. अस्पष्ट विधान मान्य केली जाणार नाहीत. दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्यास आणखी विलंब करू शकत नाही. त्यामुळे कागदपत्रे सादर करण्यास किती वेळ लागेल ते सांगा, अशा शब्दांत न्यायालयानं पोलिसांना सुनावलं होतं.

त्याआधी न्यायालयानं बचाव पक्षाच्या मागणीनुसार कागदपत्रे सादर करण्यासाठी सरकारी वकिलांना 15 मुदत दिली होती. पण, गेल्या सुनावणीवेळी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रे सापडत नसल्याचं अहवालात सांगितलं होतं.

प्रकरण काय?

मुंबईतील एका बिल्डरला 2005 मध्ये गवळीच्या टोळीकडून धमकीचे फोन आले होते. त्यात राम श्याम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत पुनर्विकास प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी 50 लाख रूपयांची मागणी केली होती.

त्यासह बिल्डरला ठार मारण्याच्या धमक्या देऊन गवळीचे घर असलेल्या दगडी चाळीत जाण्यास सांगितलं होतं. नंतर गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी, धमकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मग गवळी आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT