Arun Gawli: 'डॅडी'ला रोखण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार अलर्ट ; सुटकेनंतर गवळीच्या स्वागतासाठी राजकीय पायघड्या?

SC to hear Maharashtra govt plea on Arun Gawli: शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी ऑगस्ट २०१२ मध्ये गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Arun Gawli
Arun GawliSC to hear Maharashtra govt plea on Arun Gawli:
Published on
Updated on

Arun Gawli News:कुख्यात गँगस्टार 'डॅडी' अर्थात अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench Bombay High Court) महिन्याभरापूर्वी दिले आहे. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. लोकसभेच्या धामधुमीत 'डॅडी' बाहेर येणार म्हणून त्याच्या स्वागतासाठी राजकीय पायघड्या टाकल्या जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठने गवळीची (Arun Gawli) मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय दिला आहे. त्या निर्णयाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोह ही सुनावणी होणार आहे. गवळी सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे.

न्यायालयाने सरकारला दिलेल्या मुदतीत सरकारकडून विरोध मागे घेतला जाईल आणि अरुण गवळीची सुटका होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. गवळी भाजपसोबत जाणार की शिवसेनेला साथ देणार याचे उत्तर सुटकेनंतरच मिळणार आहे.वय झालेल्या आणि शरीराने अशक्त असलेल्या कैद्यांना मुदतपूर्व सोडण्यासाठी सरकारने लागू केलेल्या 2016 मधील धोरणाचा आधार घेत गवळीने सुटकेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे.

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी ऑगस्ट २०१२ मध्ये गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रश्नी सरकारला दोन आठवड्यांत निर्णय घ्यावा असे न्यायालयाने सांगितले होते. ही मुदत संपली आहे. गवळीसह इतर 11 जणांना 2012 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. चौदा वर्षे शिक्षा भोगली असून, 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्यामुळे जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका करावी, अशा मागणीची याचिका गवळीने केली होती.

2006च्या माफी धोरणानुसार चौदा वर्षे प्रत्यक्ष कारावास भोगलेल्या, वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या जन्मठेपेच्या कैद्यांची प्रकृतीच्या कारणास्तव सुटका करण्याची तरतूद आहे. 2015 च्या सुधारित धोरणानुसार त्याला विरोध करण्यात आला होता. मात्र 2006च्या धोरणाचा लाभ घेण्यापासून गवळीला वंचित ठेवता येणार नाही, असे मत न्यायालयाने मांडले होते.

भाजपकडून पायघड्या...

लोकसभा निकालाच्या आदल्या दिवशी आज सुनावणी होत आहे. या घटनेचा लाभ घेण्यासाठी राजकीय चढाओढ (Maharashtra Politics) लागली आहे. गवळीच्या स्वागतासाठी भाजपने (BJP) पायघड्या टाकल्याचे चित्र आहे. मुंबई दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या राहुल नार्वेकर यांनी काही दिवसापूर्वी एका सभेत थेट गवळी कुटुंबालाच साकडे घातल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

भावाची साथ: नार्वेकर

एका सभेत राहुल नार्वेकर यांनी थेट गवळी कुटुंबालाच साकडे घातले होते. “मी अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. डॅडींप्रमाणेच (अरुण गवळी) अ.भा.सेच्या कार्यकर्त्यांना प्रेम मिळेल. या परिवारात एक सदस्य आलाय, असं समजा. या बहिणीला (गीता गवळी) महापौर होईपर्यंत या भावाची साथ राहील”, असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com