Uddhav Thackeray Eknath Shinde sarkarnama
मुंबई

Mumbai North Central Lok Sabha Election : उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात 'आजचा काळा दिवस...'

Eknath Shinde News : उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्का बजावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्यात मतदान केले. मतदानानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांनी काँग्रेसला धडा शिकवला.

Roshan More

Lok Sabha Election : शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. उद्धव ठाकरे हे राहत असलेला मातोश्रीचा परिसर हा मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार नाही. महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड या मतदारसंघातून उमेदवार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना मतदान केले आहे. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंचे काँग्रेसला मतदान म्हणजे आजचा काळा काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray सहकुटुंब मतदानाचा हक्का बजावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्यात मतदान केले. मतदानानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांनी काँग्रेसला धडा शिकवला. काँग्रेसला कधीच जवळ केले नाही. त्याच बाळासाहेबांच्या वारसांनी काँग्रेसला मतदान केले. उबाठाने काँग्रेसला Congress मतदान केले. अभिमानाने मतदान केले. बाळासाहेबांनी सांगितले काँग्रेसला मतदान करू नका. शिवसेनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीतला हा काळा दिवस आहे. त्यांनी मतदान केले असले तरी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक, दिघे साहेबांचा सच्चा शिवसैनिक कधीच काँग्रेसला मतदान करणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघामध्ये सकाळी 11 पर्यंत 15.73 टक्के मतदान झाले आहे. तर, उत्तर मुंबईमध्ये 14.71, उत्तर पूर्वमध्ये 17.1, दक्षिण मुंबईसाठी 12.75, तर, दक्षिण मध्य मतदारसंघात 16.30 टक्के मतदान झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरेंचे धनुष्यबाणाला मतदान

राज ठाकरे राहत असलेला परिसरामध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) राहुल शेवाळे उमेदवार आहेत. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठींबा दिला आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हाला मतदान केले आहे.

SCROLL FOR NEXT