Uttar Pradesh Political News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडत आहे. मात्र, अनेक मतदारसंघांमध्ये मतदारांची नाराजी समोर येत आहे. मागील चार टप्प्यांमध्येही अनेक गावांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात आल्याचे प्रकार घडले. पाचवा टप्पाही त्याला अपवाद ठरला नाही. उत्तर प्रदेशातील एका गावानेही विकास न झाल्याच्या कारणास्तव मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावात खासदार फिरकलेच नाहीत, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कौशांबी लोकसभा मतदारसंघातील (Kaushambi Constituency) हिसामपूर माडो गावांतील गावकऱ्यांनी मतदान करण्यास नकार दिला आहे. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत मतदान (Voting) केंद्र ओस पडली होती. एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकले नाहीत. गावामध्ये मतदानावर बहिष्काराचे फलक लावण्यात आले आहेत. मतदान केंद्रांबाहेर जमून गावकरी मतदानाला विरोध करत आहेत. (Latest Political News)
गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, गावात काहीही विकासकामे झालेली नाहीत. अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकदाही खासदार किंवा इतर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी लोकांचे म्हणणे ऐकून घेतलेले नाही. त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गावचे सरपंच वीरेंद्र यादव यांनी सांगितले की, गावांत ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. रेल्वेमार्ग ओलांडून धोकादायक पध्दतीने जावे लागते. लहान मुलांना शाळेत जातानाही रेल्वेमार्ग ओलांडावा लागतो. आतापर्यंत रेल्वे अपघातात 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेपूल बनविण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. खासदारांनी आश्वासन दिले होते. पण त्यांनी आश्वासन पाळले नाही, असा आरोप यादव यांनी केला आहे. (Lok Sabha Election Voting)
दरम्यान, प्रशासनाकडून गावकऱ्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उपजिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय़ अधिकारी गावात दाखल झाले होते. पण गावकऱ्यांनी कोणतेही ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय मतदान करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. या मतदारसंघात मागील निवडणुकीत भाजप उमेदवार विनोद सोनकर निवडून आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.